Archive | बातमी

adivashi pade1

पवई, चांदिवलीत स्वातंत्र्यता दिवस मोठ्या उत्साहात

पवई आणि चांदिवलीच्या विविध भागात काल (शनिवार) १५ ऑगस्ट २०२० रोजी ७४वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीला पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत जागोजागी देशाच्या या उत्सवात भारतीय सहभागी झाले होते. पवई आणि चांदिवलीतील विविध ठिकाणी साजरा झालेल्या या उत्सवाचा आवर्तन पवईने घेतलेला हा आढावा. पवई चांदिवली येथील ध्वजारोहणाची सुरुवात पवई […]

Continue Reading 0
shivsena andolan sangharshnagar

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमानाच्या निषेधार्थ चांदिवलीमध्ये कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगावमधील पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याबद्दल सोमवारी शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला. चांदिवली संघर्षनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा होत नागरिकांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला. कर्नाटक सरकारच्या या कृत्याच्या निषेधार्थ चांदिवली संघर्षनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून […]

Continue Reading 0
electricity bill lande

वाढीव वीजबिल विरोधात शिवसेनेचे चेंबूर कार्यालयाजवळ आंदोलन

शिवसेनेचे स्थानिक (चांदिवली विधानसभा) आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीजबिल विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या चेंबूर येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढत हे निषेध आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत त्यांचे अधिकारी प्रत्यक्षात जाऊन त्या विभागातील जनतेच्या शंका, समस्या दूर करत नाहीत तोपर्यंत कोणतेही वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. तसेच जनतेच्या शंका दूर झाल्यानंतरच […]

Continue Reading 0
shakha 122 blood donation

पवईत शिवसेना प्रणित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

@अविनाश हजारे | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार विक्रोळी विभागांतर्गत झालेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. पवईतील आयआयटी मेनगेट येथील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये आमदार सुनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक १२२च्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शिवसेना पुरस्कृत अनेक मंडळे, संस्थांच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी समाजाप्रती असलेली आपली […]

Continue Reading 0
handi powai

पवईत कोरोनामुक्त दहीहंडी

कोरोनाने देशभर थैमान घातलेला असल्याने याचे सावट दहीकाला उत्सवावर जाणवले. मुंबईतील अनेक मानाच्या आणि मोठ्या हंड्या रद्द करण्यात आल्या. कोरोनामुळे याही उत्सवावर विरजण पडले असताना अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. पवईतही कोरोनाची स्थिती पाहता कोरोनामुक्त दहीहंडी साजरी करण्यात आली. शिवसेना शाखाप्रमुख मनिष नायर आणि माजी शाखाप्रमुख धरमनाथ पंत यांच्या संकल्पनेतून ही दहीहंडी साजरी […]

Continue Reading 0
WhatsApp Image 2020-08-11 at 6.59.30 PM

विंग कमांडर दिपक साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर ८ ऑगस्टला झालेल्या विमान दुर्घटनेत १९० प्रवाशांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पावलेले विमानाचे कॅप्टन (विंग कमांडर) दिपक साठे यांच्यावर आज (मंगळवारी) विक्रोळीतील हिंदू स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने प्रेरणादायी इतिहास रचल्याबद्दल चांदिवली नहार येथील त्यांच्या राहत्या घरी भारतीय वायुसेना आणि मुंबई पोलीस दल यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली. […]

Continue Reading 0
deepak sathe

कोझिकोडे एअर क्रॅशमध्ये चांदिवली येथील पायलट दिपक साठे यांचा मृत्यू

काल एअर इंडियाच्या एका विमानाचा केरळ येथील करिपूर विमानतळावर अपघात झाला. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून, विमानाचे मुख्य वैमानिक दिपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. चांदिवलीमधील नहार कॉम्प्लेक्स मधील रहिवाशी असणारे साठे हे कुशल वैमानिक होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबासह चांदिवली आणि पवईकरांवर शोककळा पसरली आहे. साठे यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुले शंतनू, […]

Continue Reading 0
landslide indiranagar

पवईत इंदिरानगरमध्ये दरड कोसळली; दोन घरांचे नुकसान

@प्राचा सतत दोन दिवस सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे पवईतील इंदिरानगर भागात बुधवारी पहाटे घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून, या घटनेत येथील दोन घरांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथून काहीच अंतरावर असणारी सुरक्षा भिंत पडल्याची घटना घडली होती. शेवटची माहिती हाती आली तेव्हा संध्याकाळी पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना […]

Continue Reading 0
ganeshnagar

पवईत साजरा झाला राम मंदिर भूमिपूजन उत्साह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवार, ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी सकाळी अयोध्येत पोहोचले होते. यावेळी पंतप्रधानांसह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. याचा आनंद पवईतही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन करून आणि […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!