Archive | महाविदयालय, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, शाळा

OLYMPUS DIGITAL CAMERA

पवई सायक्लोथॉनमध्ये मुंबईचे डब्बेवाले

ऊन, वारा, पाऊस काहीही असो सायकलवरून प्रवास करत वेळेच्या आत चाकरमान्यांना त्यांचा डब्बा पोहचवणारे आणि जगात मँनेजमेंट गुरु म्हणून स्थान असणारे मुंबईचे डब्बेवाले, पर्यावरण संरक्षणाच्या मुद्यावर पुढे सरसावत रविवारी १३ डिसेंबरला (उद्या) होणाऱ्या पवईच्या पहिल्या वहिल्या सायक्लोथॉनमध्ये विद्यार्थी, सायकल प्रेमी, मान्यवर, ज्येष्ठ नागरिकांसोबत शामिल होणार आहेत. हिरानंदानीच्या डोंगर, हिरवळीतून बनलेल्या रस्त्यातून आपल्या सायकलवर हे डब्बेवाले […]

Continue Reading 0
Advertiement for Cyclothon by Young Environmentalists

१३ डिसेंबरला पवईत सायक्लोथॉनचे आयोजन

मुलांना शाळेत, महाविद्यालयात जाताना सायकलचा वापर करण्यासाठी यंग इन्वायरमेंटलिस्टचे आवाहन वाहनाच्या बाहेर पडणाऱ्या धुरातून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन पसरल्याने वायूप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याबरोबरच एक उत्तम आरोग्य मिळावे म्हणून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रुस्टच्या वतीने लोकांनी सायकल संस्कृती जपावी म्हणून सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. १३ डिसेंबरला हिरानंदानीमधील हेरीटेज […]

Continue Reading 0
aai mulgi

‘परिसर आशा’ संस्था सरसावली पालकांच्या मदतीला

मुलांच्या समस्येसाठी पालकांना व मुलांना हेल्पलाईनच्या माध्यमातून करणार समुपदेशन धावपळीच्या जीवनात अनेक पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यास वेळच नसतो, त्यामुळे हळू हळू मुले आपल्याच विश्वात रमतात. जसे जसे ते मोठे होऊ लागतात तश्या पालकांच्या माझा मुलगा माझे ऐकत नाही, अभ्यास करत नाही, व्यवस्थित खातपित नाही, उलटे बोलतो, मारामारी करतो अशा एक ना अनेक तक्रारी सुरु […]

Continue Reading 0
संग्रहित छायाचित्र:

आयआयटीत पाण्याच्या वापराची चंगळ

आयआयटी विद्यार्थ्यांनी पाहणी व अभ्यास करून ‘इनसाइट’ या आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून वास्तव आणले समोर एकीकडे मुंबईकर पाणी टंचाईशी लढत असतानाच, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) मुंबईतील पवई कॅम्पसमध्ये मात्र पाण्याची चंगळ चालू असल्याची खळबळजनक माहिती आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास पाहणीतून समोर आली आहे. मुंबईकरांना सरासरी २६८ लिटर पाणी दररोज वापरास […]

Continue Reading 0
sandesh vidyalay

विद्यार्थ्यांची आरोग्य जनजागृती

आयआयटी |  रविराज शिंदे ऊन पावसाच्या चाललेल्या पाठ शिवणीच्या खेळामुळे मुंबईत डेंगू, मलेरिया, स्वाईन-फ्लू सारख्या विविध आजारांनी तोंड वर काढले आहे. या आजारांना पालिकेकडून आधीच धोकादायक आजार म्हणून घोषित करण्यात आले असून, या आजारांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु त्यानंतरही अनेक लोकांपर्यंत माहिती पोहचत नसल्याने, अनेक लोक आजही या आजारांचे बळी पडत […]

Continue Reading 0
sm shetty traffic

बेजाबदारपणे उभ्या शालेय बस आणि पालकांच्या गाड्यांमुळे पवईमध्ये वाढतोय वाहतूक कोंडीचा प्रश्न

शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि पवईच्या रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था सकाळी सकाळी पवईकरांनी अनुभवली. कामाला जाणाऱ्यांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेवून येणारे बस चालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे पवईचे सगळे रस्ते सकाळी-सकाळी ‘हाउस फुल्ल’ झाले होते. आधीच पावसाळ्यात गाड्यांच्या कमी झालेल्या वेगांवर […]

Continue Reading 3

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!