Archive | समाज प्रबोधन, समाजकार्य / समाजसेवा

तुम्ही बाहेर तर कोरोना घरात; पवईकरांनो घरातच थांबा

जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने मुंबईतही प्रवेश केला आहे. या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आता शासनासह पालिकेने सुद्धा कंबर कसली आहे. यानुसारच ३ एप्रिल पर्यंत पवईतील ३ विविध परिसरांना सिल करण्यात आले आहे. जर पवईकर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येणे बंद नाही केले तर पवईतील अजूनही काही परिसर सिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यकता […]

Continue Reading 0
powai blood donation2

पवईत हायजेनिक रक्तदान शिबीर

@रविराज शिंदे, रमेश कांबळे: देशात कहर माजवणाऱ्या कोरोना वायरसशी लढा लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. देशात लॉकडाऊन असून, या काळात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी छोट्या छोट्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पवई बीजेपी वॉर्ड १२२ तर्फे आयआयटी पवई येथील जैन मंदिर हॉलमध्ये […]

Continue Reading 0
asha for education 1

आशा फॉर एज्युकेशनतर्फे पवईत गरजूंना धान्य वाटप

@प्रतिक कांबळे: देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी सरकार व अनेक सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्न आणि धान्याचे वाटप केले जात आहे. याच सेवेत आपला खारीचा वाटा उचलत पवईस्थित आशा फॉर एज्युकेशन मुंबईतर्फे पवईतील २०० गरजूंना लॉकडाऊनच्या या काळात प्रत्येक आठवड्याला मोफत तांदूळ, ५ किलो पीठ, २ किलो डाळ, २ किलो साखर, १ लीटर […]

Continue Reading 0

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या मदतीला पवईतील तरुणी सरसावल्या

@सुषमा चव्हाण: पूर्वी फक्त चूल आणि मूल यात अडकून पडलेली तरुणी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. कोरोना व्हायरसने आता देशभर हाहाःकार माजवलेला असतानाच लॉकडाऊन स्थितीत अनेक तरुण गरीब गरजूंच्या मदतीला आणि अविरत सेवा पुरवणाऱ्या मुंबई पोलिसांच्या मदतीला पुढे आलेले असतानाच आता पवईतील तरुणी सुद्धा यात मोठा सहभाग नोंदवत असल्याचे समोर आले आहे. कोरोना […]

Continue Reading 0
food donation 1

पवईत तरुणांकडून गरजू गरीबांना जेवणाची सोय

आपल्या परिसरातील एकालाही उपासमारीमुळे मरू द्यायचे नाही हा उद्देश समोर ठेवत तरुण जपत आहेत सामाजिक बांधिलकी. गरजू गरीबांना केली जेवणाची सोय. संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीत असताना गरीब आणि बेघर लोकांच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी पवईतील तरुणांनी पुढाकार घेत, आज, २६ मार्चला विविध भागात उड्डाणपुलांखाली आसरा घेतलेल्या गरीब गरजू लोकांना अन्नदान केले. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आणि […]

Continue Reading 0
circle

सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पवई, चांदिवलीत महानगरपालिकेकडून खबरदारी

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांचा वाढता आकडा बघता वाढत्या प्रादुर्भावाला दुसऱ्या स्टेजवरच रोखण्यासोबतच सोशल डीस्टेन्सिंग (सुरक्षित अंतर) ठेवण्यासाठी पवई, चांदिवलीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठोस पाऊले उचलली आहेत. पालिका एस विभागातर्फे पवईतील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांसमोर सुरक्षित अंतरावर चौकोनी बॉक्स आणि रिंगण आखण्यात आले आहेत. या रिंगणात उभे राहिलेल्यांना सामान देण्यात यावे व सुरक्षित असे अंतर ठेऊन संसर्ग होण्यापासून […]

Continue Reading 0
bazaar4

संचारबंदी कालावधीत पवईत दामदुप्पट किमतीने भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलीस, समाजसेवकांची तंबी

कोविड – १९ आजाराने जगभराला आपल्या विळख्यात घेतलेले असताना, नोविड कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरत जाणारया या आजाराला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने देशभर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. २५ मार्च पासून लागू झालेले संचारबंदी आदेश २१ दिवसांकरिता असणार आहेत. या कालावधीत फक्त जीवनाश्यक वस्तू, मेडीकल, दूध, भाजीपाला, फळे विक्री सारखी दुकाने सुरू ठेवण्याकरिता […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes