Archive | स्थानिक समस्या

vruksh tod

मेट्रो – ६ घेणार ३४० झाडांचा जीव?

पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर मेट्रो – ६ प्रकल्पात कुऱ्हाड स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मार्गावर चालणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे. पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर या प्रकल्पासाठी […]

Continue Reading 0
traffic on JVLR

खड्यात ट्रेलर फसल्याने ९ तास जेव्हीएलआर ठप्प, चाकरमान्यांचे हाल

@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मिलिंदनगरजवळ बुधवारी एक भलामोठा ट्रेलर खड्यात चिखलात अडकल्याने तब्बल ९ तास जेव्हीएलआरवरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी सकाळी ६ वाजता मेट्रोच्या कामासाठी लागणारे टीबीएम मशिन घेवून एक ट्रेलर सिप्झच्या दिशेला जात होता. पाठीमागील काही दिवसात सतत पावसाची […]

Continue Reading 0
The citizen delegation during the meeting with BMC officials

पवई तलावातील जलपर्णी काढण्यापासून पालिकेची चालढकल

पवई तलावाला हळूहळू नष्ट करणाऱ्या जलपर्णीना काढण्याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिका्यांनी नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. एका अधिकाऱ्याने प्रतिनिधीना सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे […]

Continue Reading 0
JVLR traffic problem

वाहतूक कोंडीचा ‘महामार्ग’; जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गर्दीच्या काळात व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) वाहतुक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड वापरण्यास हलक्या व मध्यम व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत […]

Continue Reading 0
vruksh tod

वृक्षतोडीच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी – विसंगती, मेट्रो ४ आणि ६ साठी सुधारित प्रस्ताव मागवणार

मेट्रो ४ आणि ६ मार्गिकेसाठी तोडल्या जाणाऱ्या आणि पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या वृक्षांसाठी सुमारे दहा हजार नागरिकांनी इमेलद्वारे एकत्रितपणे आक्षेप नोंदवले. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (मेट्रो ६) आणि कासारवडवली ते वडाळा (मेट्रो ४) या दोन मेट्रो मार्गिकांमधील १८२१ झाडे हटवण्याकरिता ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी व विसंगती आढळून आल्याने ते प्राधिकरणाला […]

Continue Reading 0
Aarey human chain

आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी

@संजय पाटील मुंबई : आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकत्र येत मानवी साखळी रचली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीने २२३८ झाडे तोडण्याची मंजुरी दिली. आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी झाडांची कत्तल केली जाणार आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी रचली. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात तरुणाई आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत घोषणा दिल्या. आज सकाळी ११ […]

Continue Reading 0
meeting sangharsh nagar problem

संघर्षनगरकरांचा संघर्ष संपणार, नागरी सुविधांसाठी पालिकेकडून ८० कोटीची मंजूरी?

पाठीमागील १२ वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या चांदिवली येथील संघर्षनगरकरांना आता दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी स्थानिक नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, मुंबई महापौर आणि पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत या परिसरातील नागरी सुविधांसाठी पालिकेतर्फे ८० कोटीचा फंड मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे […]

Continue Reading 0
loksanvad

मेट्रो ६ आणि मेट्रो ४ प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसाठी लोकसंवादचे आयोजन

मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या मुंबई लोकलवर वाढता दबाव आणि मुंबईला नवीन पर्यायी वाहतूक व्यवस्था असावी म्हणून मुंबई मेट्रोचे जाळे मुंबईसह आसपासच्या परिसरात पसरवले जात आहे. हे जाळे पसरवत असताना मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. मुंबई मेट्रो प्रकल्प ४ आणि ६ यांच्या निर्मितीवेळी नागरिकांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर काय उपाय […]

Continue Reading 0
DSC09622

पवई तलावावर जलपर्णींचे साम्राज्य; सहा महिन्यांपासून स्वच्छता नाही

कंत्राटदाराची नेमणूक करणे बाकी असल्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असणाऱ्या पवई तलावाला सहा महिन्यांपासून साफ केले गेले नाही. जर लवकरात लवकर जलपर्णीना काढून टाकले नाही तर लवकरच तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापला जाईल अशी चिंता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईचे वैभव असणारा पवई तलाव दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची पाणी साठवण्याची क्षमता हळू हळू […]

Continue Reading 0
bhajiwala sangharsh nagar

संघर्षनगरमध्ये सांडपाण्यात धुतल्या जातात भाज्या; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

संघर्षनगरमधील लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भाजीवाल्याला मनसेने शिकवला धडा चांदिवली, संघर्षनगर येथे गटाराच्या पाण्यात भाज्या धुवून त्या विक्रीस ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे. येथील एका भाजीवाल्याचा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार मनसे सैनिकांनी उघडकीस आणला आहे. संघर्षनगर येथील इमारत क्रमांक ११ येथे भाजी विक्री करणारा एक भाजी विक्रेता गटारात जाणाऱ्या सांडपाण्यात भाज्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes