Archive | स्थानिक समस्या

1

कचऱ्याच्या साम्राज्याने पंचकुटीरकर हैराण, कचऱ्याचे डबे हटवण्याची स्थानिकांची मागणी

पंचकुटीर परिसरामध्ये सुरक्षा भिंतीला लागून बनवलेल्या कचरापेटीतून कचरा बाहेर वाहून परिसरात घाण, दुर्गंधी आणि आजार पसरत असल्याने पंचकुटीरवासी हैराण झाले आहेत. या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून, लवकरात लवकर त्या ठिकाणचे कचऱ्याचे डबे हलवण्याची मागणी आता परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे. तसे न झाल्यास, नागरिकांकडून हे कचऱ्याचे डबे घेऊन पालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला […]

Continue Reading 0
road

पंचसृष्टीकरांना प्रतिक्षा ‘अच्छे दिन’ची

उखडलेले रस्ते, वाहतुकीची कोंडी, सोनसाखळी, मोबाईल चोरी, पथ दिव्यांची कमतरता, बरोबरच मूलभूत सुविधांसाठी गेली अनेक वर्ष प्रशासनाशी लढाई करत असलेल्या पंचसृष्टी नागरिकांना, मोदी सरकारच्या राज्यात तरी आपल्याला या सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी येथील स्थानिक मूलभूत सुविधा आणि अनेक अडचणींचा सामना करत अजूनही अच्छे दिन ची वाट पाहत […]

Continue Reading 0
DSC09622

पवई तलाव बनला मृत्यूचा सापळा, असुरक्षिततेच्या मगरमिठीत

करोडो रुपये खर्च करून सुशोभित करण्यात आलेला पवई तलाव सध्या मृत्यूचा सापळा बनून असुरक्षिततेच्या मगरमिठीत सापडलेला आहे. पवई तलाव आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी पालिकेने तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत, परंतु सुरक्षेच्या दक्षतेच्या अभावी तलावात असलेल्या मगरींनी पाण्यात उतरलेल्या अनेक लोकांना जखमी केले आहे तर काहींचा जीव सुद्धा घेतला आहे. केवळ गेल्या १५ दिवसात मासेमारी […]

Continue Reading 0
souchalay

आदिशंकराचार्य मार्गावरील स्वच्छतागृहांना अखेर मंजुरी, लवकरच बांधकामाला सुरुवात

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पवईच्या हद्दीत एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही आहे. ज्याच्यासाठी स्थानिकांच्या वतीने आंदोलन आणि पाठपुराव्या सोबतच परिसराचे नगरसेवक चंदन चित्तरंजन शर्मा यांच्या प्रयत्नातून आयआयटी मेन गेट, आयआयटी मार्केट गेट आणि विसर्जन घाट या तीन वेगवेगळ्या ठिकाणी कंटेनर पध्दतीचे शौचालय मंजूर करण्यात आले आहे. चालू आठवड्यातच सदर स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात […]

Continue Reading 0
HNG drainage issue

हिरानंदानीकरांचा प्रवास गटाराच्या पाण्यातून, शाळेतील मुले पडत आहेत आजारी

हिरानंदानी येथील ओर्चीड एव्हेन्यू रोडवरील हिरानंदानी स्कूल शेजारील गटाराचे घाण सांडपाणी संपूर्ण रस्त्यावर पसरत असल्याने, पवईकर आणि खास करून हिरानंदानी परिसरातील नागरिकांना गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. शेजारीच असणाऱ्या हिरानंदानी शाळेतील मुले आजारी पडत असल्याबाबत मुलांच्या पालकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. “आम्ही कारण शोधून काढले असून काम सुरु केले आहे. २ दिवसापूर्वी सुरु झालेल्या […]

Continue Reading 0
FOB HNG fnl

पवईतील पादचारी पूल नक्की कोणासाठी? पुलावर भिकारी, गर्दुल्यांचे अतिक्रमण

पवई येथील हिरानंदानी बसस्थानक पादचारी पुलावर गेल्या काही महिन्यांपासून भिकारी, गर्दुले यांनी अतिक्रमण केले आहे. या पुलावर छेडछाड, चोरीच्या घटना घडू लागल्याने आता पादचाऱ्यांनी या पुलाचा वापर करणेच टाळले आहे. ही केवळ याच नाही तर पवईमधील बऱ्याच पादचारी पुलांची अवस्था आहे. या संदर्भात स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी मनपा प्रशासन व पवई पोलिसांना लेखी […]

Continue Reading 0
pl2

पवई तलाव बत्ती गुलची तक्रार पोहचली हॉटलाईनवर, त्वरित दिवे चालू करण्याचे शिवसेना भवनातून आदेश

मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करून पदपथावर लावलेले दिवे, गेले एक महिने बंद पडले आहेत. याची तक्रार जल अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्याकडे पवईकरांकडून वारंवार करून सुद्धा, पदपथावरील दिवे चालू झाले नाहीत. शेवटी कंटाळून पवईकर नागरिकांनी महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने तक्रार नोंदवण्यासाठी सुरु केलेल्या हॉटलाईनवर याबाबत तक्रारी […]

Continue Reading 0
police public meet

पवईमध्ये पोलीस, जनता आणि गुन्हेगारी निर्बंध या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

पोलीस आणि जनता हे एकमेकांचे मित्र आहेत. एकमेकांच्या साथीने गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालू शकतात. यासाठी जनता आणि पोलीस एकत्रित यावे म्हणून, आयआयटी पवई येथील जैन मंदिर सभागृहात पोलीस, जनता आणि गुन्हेगारी निर्बंध या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पवई पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर, साकिनाका विभागाचे सहाय्यक […]

Continue Reading 0
tree colaps1

पवईच्या झाडांना नक्की झाले आहे तरी काय? काही सुकून पडत आहेत, तर काही वरून गळत आहेत

एकेकाळी हिरवळीचे राज्य असलेल्या पवईला, आता सिमेंटचे जंगल म्हणून ओळख मिळालेली आहे. उंच उंच इमारती आणि विकासाच्या बूममध्ये, या परिसरातील निसर्ग संपत्तीचा दिवसेंदिवस नाश होत चालला असतानाचा, आता पवईतील झाडांना सुद्धा काहीतरी झाले आहे. विभागातील अनेक झाडे, गेल्या काही महिन्यात उन्मळून पडली आहेत, तर काही झाडांचे वरील भाग गळून पडले आहेत. या गळती होणाऱ्या आणि […]

Continue Reading 0
pl2

पवई तलावाची बत्ती गुल, प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत

पवईची वाढती लोकप्रियता आणि पर्यटन स्थळ म्हणून मुंबईकरांचा ओढा पाहता मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे, परंतु जवळपास एक महिन्यापासून या सुशोभिकरण करण्यात आलेल्या परिसरात बनवलेल्या पदपथावरील दिवेच बंद पडलेले आहेत. त्यामुळे पवईच्या राणीचा नेकलेस चोरीला गेली कि काय असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलेला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes