Archive | स्थानिक समस्या

00

फेरीवाला क्षेत्राच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा

@प्रमोद चव्हाण पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी परिसरातील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित करण्यात आले आहे. फेरीवाले येण्याने होणाऱ्या त्रासाला रोखण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानी गार्डन रहिवाशी फेडरेशनतर्फे हिरानंदानी येथे शांततापूर्वक विरोध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध समाजसेवी संस्थांसह, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. अधिकृत […]

Continue Reading 0
IMG_5175

कडक पोलीस बंदोबस्तात आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर भुईसपाट

१९२५ पासून थाटात उभे असणारे आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर आज सकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास हटवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत पालिकेने सकाळी हि निष्कासनाची कारवाई केली. भक्तांच्या भावनांचा उद्रेक होवून वातावरण बिघडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. ९२ वर्षापूर्वी पवई तलावाचे काम सुरु असताना मारुतीची मूर्ती श्रीधर परांजपे […]

Continue Reading 0

आयआयटी येथील जेव्हीएलआरवरील मारुती मंदिर अखेर हटणार, भक्तांचा आंदोलनाचा इशारा

गेली अनेक वर्षे मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तांची चालू असलेली धडपड अखेर संपुष्टात आली आहे. लवकरच पवईमधील आयआयटीजवळ जेव्हीएलआरवर असणारे मारुती मंदिर हे हटवून बाजूलाच असणाऱ्या राम मंदिरात येथील मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ५ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर मालक परांजपे यांनी याला संमती दर्शवली असून, विशेष […]

Continue Reading 0

पवई फेरीवाला क्षेत्राच्या घेऱ्यात; नागरिकांचा हॉकिंग झोनला विरोध

@प्रमोद चव्हाण पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी, आयआयटी आणि फिल्टरपाडा भागात मिळून २१२६ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे. हिरानांदानीतील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित केल्याने नागरिकांचा तीव्र विरोध. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हॉकिंग झोन अंतर्गत मुंबईतील २४ विभागांमध्ये २२०९७ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी व्यवसाय कुठे बसून करावा म्हणजेच फेरीवाला क्षेत्र (हॉकिंग […]

Continue Reading 0

युथ पॉवरच्या छत्री वाटप आंदोलनाला ‘बेस्ट’ यश; बस थांब्यावर बसवले छप्पर

रविराज शिंदे पवईमधील आयआयटी येथील सर्वच बस थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना पावसाळ्या सोबतच उन्हातान्हात सुद्धा त्रास सहन करत बस येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. या बस थांब्यावर छप्पर उभारण्यात यावेत यासाठी, ‘युथ पॉवर’ संघटनेच्यावतीने बेस्ट प्रशासनाला कानपिचक्या काढत प्रवाशांना छत्री वाटप करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बेस्ट प्रशासनाने दखल घेत अखेर पवईतील […]

Continue Reading 0

हिरानंदानीत बांधकाम थांबलेली जागा बनली आजार पसरवणाऱ्या मच्छरांचा उत्पत्तीचा अड्डा

हिरानंदानी गृप दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. स्थानिक नगरसेवक वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर पालिका एस विभाग अधिकाऱ्यांनी आज भेट देवून केली परिस्थितीची पहाणी. हिरानंदानी विकासकाकडून पवई, हिरानंदानी येथील ओडिसी आणि तिवोली इमारतींजवळ सुरु असणाऱ्या एका नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून थांबवण्यात आले असून, येथे जमा झालेल्या घाण पाण्यामुळे आजार […]

Continue Reading 0

शिव-भगतानी रोडला खड्डे; खाजगी रोड असल्याचे सांगत पालिकेचे दुर्लक्ष

आवर्तन पवई | पवई – चांदिवली चांदिवली आणि हिरानंदानी भागाला जोडणारा शोर्टकट रोड शिवभगतानी कॉम्प्लेक्समधून जात आहे. या रोडवरून होणाऱ्या मोठ्या वाहतुकीमुळे येथील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. कॉम्प्लेक्सची निर्मिती करणाऱ्या विकासकाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, रस्ता खाजगी असूूून विकासकाने पालिकेच्या स्वाधिन केला नाही असे सांगून पालिका याच्यातून हात […]

Continue Reading 0

नगरसेविका वैशाली पाटील यांच्या प्रयत्नातून तिरंदाज पालिका शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरु

तिरंदाज व्हिलेज पालिका शाळेत इमारतीच्या स्लबचे पोपडे निघून पावसाळ्यात पाणी गळती होत होती. तसेच परिसरात शेवाळ तयार झाल्याने मुले घसरून पडण्याची शक्यता वाढली होती. याची दखल घेत स्थानिक नगरसेविका यांच्या प्रयत्नातून शाळा इमारत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये आधीच मुलांची संख्या कमी झाली होती त्यातच […]

Continue Reading 0

स्वच्छ पवई अभियानाचे तिन तेरा, गोखलेनगरजवळ फुटपाथवर फेकला कचरा

कचरा उचलण्याचे काम करणारा जुना कंत्राटदार राजू आम्हाला त्रास देण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करत आहे – श्रीकांत पाटील  (भाजप जेष्ठ कार्यकर्ते – वार्ड १२२) पवईमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ पवई अभियान या उपक्रमाला खोडा घालत पवईमध्ये घाण पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गोखलेनगर येथील एका पडक्या […]

Continue Reading 0

नवनिर्मित विजय विहार रोडला खड्डे

पावसाळ्यात पालिकेने बनवलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे, मात्र पाऊस नसतानासुद्धा नुकत्याच दुरुस्तीचे काम केलेल्या विजय विहार रस्त्याला खड्डे पडल्याचा प्रकार घडला आहे. येथील विजय विहार ते पवई विहार जोडणाऱ्या रस्त्याला महिना भराच्या आतच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी आमदार नसीम खान यांच्या प्रयत्नाने महानगर पालिकेच्यावतीने या रोडच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes