Archive | Chandivali News

Sakinaka Police Station temporary shifted near Sangharsh Nagar1

साकीनाका पोलीस ठाणेचे संघर्षनगरजवळ स्थलांतर; खा. पूनम महाजनांच्या हस्ते उद्घाटन

साकीनाका पोलीस ठाण्याच्या चांदिवली म्हाडा येथील इमारतीच्या पुनर्बांधणी प्रकल्पाच्या योजनेमुळे येथील पोलीस ठाणे काही काळासाठी संघर्षनगर येथील एमएमआरडीए इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. मंगळवार २० सप्टेंबरला खासदार पुनम महाजन यांच्या हस्ते या स्थलांतरित पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा पार पडला असून, येथून कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी खा. महाजन यांच्यासोबतच मुख्य अतिथी म्हणून मुंबई पोलीस […]

Continue Reading
Aditya Thackeray took darshan of Chandivalicha Maharaja0

आदित्य ठाकरेंनी घेतले चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज, गुरुवार ०८ सप्टेंबरला चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत माजी परिवहन मंत्री अनिल परब, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, युवासेना विभाग अधिकारी बालाजी सांगळे आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी संघटना मजबूत करत तिला वाढवण्यासाठी […]

Continue Reading
Powai Traffic Department; Dr. Suryavanshi led team

पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग; डॉ. सूर्यवंशींकडे नेतृत्व

पाठीमागील अनेक वर्षांपासून साकीनाका वाहतूक विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या पवई परिसराला आता स्वतःचा स्वतंत्र वाहतूक विभाग मिळाला आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असणाऱ्या पवई विभागाला डिसेंबर २००२ला स्वतंत्र करत पवई पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती आणि आता २०२२च्या सुरुवातीला पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग देण्यात आला आहे. पवई वाहतूक विभागाचे प्रमुख पद पोलीस निरीक्षक डॉ. उत्तम […]

Continue Reading
Powai police dialogue with journalists, social activists on issues & preventing-crime

पवईतील समस्यांवर पोलीस, पत्रकार, सामजिक कार्यकर्ते यांच्यात संवाद

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शनिवार, १८ जूनला पवई पोलीस ठाण्यातर्फे पोलीस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात एका संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच तरुणाईमधील वाढती गुन्हेगारीसह विविध प्रश्नावर यावेळी चर्चा करण्यात आली. पोलिस, जनतेच्या समन्वयातून कायदा सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनसेतू तयार होत […]

Continue Reading
Environment Minister Aditya Thackeray inaugurates development works at Powai Chandivali00

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पवई चांदिवलीत विकास कामांचे उदघाटन

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार […]

Continue Reading
4 crimes in 40 days using a stolen motorcycle; police arrested teen

चोरीच्या मोटारसायकलवरून ४० दिवसात ४ चोऱ्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

साकीनाका परिसरातून मोटारसायकल चोरी करून मुंबईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सरफराज उमर कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रिमांड होममधून बाहेर येताच केवळ ४० दिवसात या चोरट्याने ४ गुन्हे केले आहेत. एका अल्पवयीनच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला डोंगरी रिमांडहोममध्ये ठेवण्यात आले होते. १५ जानेवारी रोजी त्याची रिमांड […]

Continue Reading
COVID-vaccine

चांदिवलीत मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन म्हणून ‘सावली सेवा फाऊंडेशन’च्यावतीने १८ डिसेंबर रोजी सकाळीं १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत एकदिवसीय कोविड लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. चांदिवली येथील सिंहगड कॉलेज, म्हाडा कॉलनी येथे ही लसीकरण मोहीम राबवली जाणार असून, कोविड-१९ पासून सुरक्षेसाठी शासन मान्य पहिला आणि दुसरा कोव्हीशिल्ड (Covishild) लसीचा डोस यावेळी […]

Continue Reading
metro-station1

मेट्रो स्थानकाला रामबाग चांदिवली नाव द्या; चांदिवलीकरांची मागणी

मुंबई मेट्रो ६ प्रकल्पाचे काम जोमाने सुरु असून, जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर रामबाग येथे येणाऱ्या स्थानकाला रामबाग (चांदिवली) असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी चांदिवलीकरांकडून जोर धरू लागली आहे. यासाठी सर्व प्रशाकीय यंत्रणांसोबतच राज्याच्या विविध मंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. पश्चिम उपनगरातील अंधेरीतील स्वामी समर्थ नगर-लोखंडवाला ते पूर्व उपनगरातील विक्रोळी आणि कांजूरमार्ग यांना १३ स्थानकांद्वारे जोडणारी […]

Continue Reading

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!