आयआयटी पवईतील विद्यार्थी बैलाच्या धडकेत जखमी

दोन बैलांच्या झुंजीत विद्यार्थ्याला उडवल्याची घटना पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये घडली. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला आहे.

पवईतील आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याला झुंज करणाऱ्या बैलानी धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. जखमी विद्यार्थ्याचे नाव अक्षय लथा असर असे आहे. त्याच्यावर विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन बैलांमध्ये झुंज सुरू असताना धावणाऱ्या बैलाने गेट क्रमांक ९ जवळ अक्षयला जोरदार धडक दिली. त्यानंतर जमलेल्या लोकांनी अक्षयला मदत करून रुग्णालयात दाखल केले.

या संदर्भात समोर आलेल्या सीसीटीव्हीनुसार, पवईतील आयआयटी कॅम्पस येथील गेटजवळ आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी सायकल उभ्या करण्याच्या भागात उभा असल्याचे दिसत आहे. आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी करत असताना दोन बैल त्याच्याकडे धावत येताना दिसत आहेत. यापैकी पुढे धावणारा बैल धावताना समोर असलेल्या त्या विद्यार्थ्याला धडक देतो. या धडकेत जखमी झालेला विद्यार्थी खाली कोसळला असून, काही विद्यार्थी त्याला उचलण्याचा प्रयत्न करत आहेत.

अक्षय लथा असर असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो त्रिवेंद्रम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. इंटर्नशिपसाठी पवईच्या आयआयटीमध्ये तो आला आहे. अँपच्या माध्यमातून सायकलचे लॉक खोलण्यासाठी सायकल स्टँडजवळ उभा असताना त्याच्यासोबत ही दुर्घटना घडली. विक्रोळीच्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले असून, किरकोळ जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर असणाऱ्या मंदिर आणि फुटपाथवर या भटक्या बैलांचा वावर असतो. आयआयटीमधील पवई तलाव भागात हिरवा चार उपलब्ध असल्याने अनेक बैल येथील विविध गेटमधून कॅम्पस भागात प्रवेश करत असतात. त्यामुळे कॅम्पसमध्ये सुद्धा यांचा वावर वाढला आहे. पूर्वी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी संख्या असणाऱ्या यांच्या कळपात काही गाई समाविष्ट झाल्याने दिवसेंदिवस यांची संख्या वाढत चालली आहे. भर रस्त्यात यांच्या येण्याने अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. बऱ्याचवेळा यांच्या झुंजीत अडकून पडल्याने वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण होत असते.

मोकाट बैलांना रोखण्यासाठी आयआयटी पवईने तातडीने एक समिती नेमली असून, समिती महापालिका आणि प्राणी तज्ज्ञांशी संपर्क चर्चा करून यावर योग्य ती उपाययोजना सुचवेल असे आयआयटी पवईकडून माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!