विविध मागण्यांसाठी शेकडो चांदिवलीकर रस्त्यावर

अर्धवट रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी, पदपथावरील अतिक्रमण, प्रदूषण अशा विविध मागण्यांसाठी रविवारी शेकडो चांदिवलीकर रस्त्यावर उतरले. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या शांतता आंदोलनात २५० पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते.

वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष करत असल्याने पालिका आणि महाराष्ट्र शासनाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी चांदिवली येथील ९० फुट रोडवर हे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.

चांदिवली परिसर पाठीमागील अनेक वर्षांपासून सुविधापासून वंचित राहिला असून, यासाठी नागरिक आणि रहिवाशी संघटना सतत पाठपुरावा करत असून, समस्या अजून तशाच आहेत.

यासंदर्भात बोलताना चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनचे मनदीप सिंग यांनी सांगितले की, “चांदिवली अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. येथील डीपी रोड ९ हा एकमेव रोड चांदिवलीला जेविएलआरशी जोडतो. या मार्गावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. येथील फुटपाथवर नागरिकांनी आपली घरे, दुकाने उभी केली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात त्यामुळे केवळ एक गाडी पास होईल एवढीच जागा उरलेली असते. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विकास आराखड्यात येथे ९० फुटी रस्ता मंजूर झाला तर आहे मात्र तो वर्षानुवर्ष कुठे अडकून पडलेला आहे कळत नाही.”

ते पुढे म्हणाले, रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे साचलेले असतात, अनेक भागात कचराकुंड्या नाहीत. परिसरात प्रदूषण वाढले आहे. याबाबत आम्ही सतत पालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र त्यांनी आमच्याकडे कानाडोळा केला आहे. उलट आम्हाला एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फेऱ्या मारण्यास भाग पाडत आहेत, कारवाई मात्र काहीच नाही, म्हणूनच आम्ही नागरिकांनी एकत्रित येत अखेर हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशन केवळ आंदोलन करून थांबणार नाही, लवकरच आम्ही पालिका सहआयुक्त, आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट घेवून आपल्या समस्या मांडणार आहोत. हा केवळ एक छोटा धमाका आहे जर प्रशासनाने आमच्या समस्यांचे निराकरण केले नाही तर येणाऱ्या काळात त्यांना मोठा धमाका पाहायला मिळेल, असा इशाराही यावेळी बोलताना असोसिएशनने दिला.

, , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: