कलवर्टच्या कामामुळे चांदिवलीचा चक्का जाम

photo: Rajinder B

चांदिवली फार्म रोड, डीपी रोड २ आणि संघर्षनगर भागात सुरु असणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी रस्ते बंद केल्याने तथा एकेरी मार्ग चालू ठेवल्याने चांदिवली वाहतूक कोंडीत अडकलेली आहे. त्यातच ८ दिवसापूर्वी चांदिवली फार्म रोड चौकात सुरु असणाऱ्या कलवर्टच्या कामामुळे चांदिवलीत चक्क जाम स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चांदिवलीकरांसोबत या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी देखील वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने चांगलेच त्रासलेले आहेत.

चांदिवली परिसरात रहिवाशी संकुलांचे प्रमाण गेल्या एक दशकात झपाट्याने वाढले आहे. यासोबतच या परिसरात नागरी सुविधांचा विकास जेवढ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने चांदिवली अडकून पडल्याचा अनुभव येथील रहिवाशी करू लागले आहेत.

चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणाऱ्या शिवभगतानी रोड आणि नंतर चांदिवली फार्म रोडवरील शिवाजी महाराज चौक ते गुंडेचा हिल भागात रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सुरु असल्याने जवळपास वर्षभरापासून चांदिवलीचे हिरानंदानीशी कनेक्शन तुटले आहे. मध्यंतरी शिवभगतानी रोडच्या निर्मितीनंतर नागरिकांना थोडासा दिला मिळाला होता. मात्र काही दिवसातच चांदिवली फार्म रोडवर काम सुरु झाले आणि वाहतूक बंद केल्याने पुन्हा नागरिक कैचीत अडकले.

“आम्ही या मार्गाची पाहणी केली तेव्हा लक्षात आले की, कंत्राटदाराकडे माणसांची कमतरता आहे त्यामुळे काम खूपच संथ गतीने सुरु आहे. त्यातच भर म्हणून या मार्गावर असणाऱ्या एका चाळ सदृश्य लोकवस्तीजवळ कलवर्ट बनवण्याच्या कामात हा रस्ता २ महिने अडकून पडला आहे”, असे यासंदर्भात बोलताना चांदिवलीकर विशाल जाधव म्हणाले.

अजून एक रहिवाशी म्हणाले, “हे कमी होते की काय, पालिकेकडून नहार रोडवर (डीपी रोड २) काम सुरु करण्यात आले, त्यामुळे चांदिवलीत अधिकच वाहतूक कोंडी वाढली आहे. आता त्यात भर म्हणून दुर्गादेवी शर्मा शाळेसमोर चांदिवली फार्म रोड, डीपी रोड ९ आणि डीपी रोड २ जोडणाऱ्या चौकातच पालिकेचे कलवर्ट बनवण्याचे काम ८ दिवसापूर्वी सुरु झाले आहे.”

ते पुढे म्हणाले, “कलवर्ट बनवण्याच्या या कामासाठी जवळपास २ महिन्यापूर्वीच खोदकाम करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव हे काम थांबवण्यात आले होते त्यामुळे वाहतूक कोंडीपासून थोडा दिलासा मिळत होता. मात्र आता हे काम सुरु केल्याने या कामासाठी जेसीबी, क्रेनने काम सुरु असून, बरीकेड केल्याने खूप निमुळता रोड उरतो. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा चांदिवली फार्म रोडवर लागत आहेत.”

यासंदर्भात बोलताना रहेजा विहार रहिवाशी पार्थासार्थी म्हणाले, “चांदिवली फार्म रोडवर सुरु असणाऱ्या या वाहतूक कोंडीत तासंतास अडकून पडल्याने सकाळी कामावर जाण्याच्या वेळेसच रहेजाकरांची चागलीच दमछाक होत आहे. त्यामुळे आम्ही रहिवाशांनी चांदिवली फार्म रोडवर येण्याऐवजी साकीविहार रोडमार्गे एल-एंड-टी आणि पुढे जेवीएलआर मार्गे लांब फिरून प्रवास करणे पसंद केले आहे.”

‘आवर्तन पवई’ने सुरु असणाऱ्या कामाबद्दल येथील सुपरवायझरशी बोलले असता अजून किमान ३ ते ४ आठवडे हे काम चालेल असे सांगण्यात आले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: