चांदीवलीत डिलिव्हरी बॉयला कचऱ्याच्या डंपरने चिरडले

चांदीवली येथील लेकहोम जवळ एका डिलिव्हरी बॉयला डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. डिलिव्हरी बॉय सकाळी कामावर हजर होत असताना मोटारसायकल घसरल्याने डंपरखाली आल्याने ही घटना घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत डंपर चालक मोहम्मद आरिफ मोहंम्मद याकूब शहा (३४) याला अटक केली आहे.

चांदीवली येथील संघर्षनगर भागात राहणारे आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे सुभाष देशमुख (५०) हे सकाळी आपली ऍक्टिवा मोटारसायकल क्रमांक एमच ०३ डीएन ६३७० वरून कामावर जाण्यासाठी घरातून निघाले. “चांदीवली फार्म रोडवरून प्रवास करताना लेकहोम गेट जवळ एक कचऱ्याच्या डंपरला (एमएच ०१ सिवी २६४१) ओव्हरटेक करत होते. यावेळी त्यांचा गाडीवरील समतोल सुटला आणि त्यांची मोटारसायकल घसरून ते गाडीखाली आले,” असे पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “पाठीमागील उजव्या चाकाच्या खाली आल्याने गाडीचे चाक सरळ त्यांच्या डोक्यावरून आणि मानेच्या भागातून गेल्याने त्या भागाचा अगदी चेंदामेंदा झाला.”

पवई पोलिसांना याबाबत माहिती मिळताच मोबाईल १च्या मदतीने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

“त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भादवि कलम २७९, ३३८, ३०४ नुसार गुन्हा नोंद करून निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात आम्ही डंपर चालक शहा याला अटक केली आहे,’ असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!