चांदिवलीत बनणार भव्य क्रीडा संकुल

sport complexचांदिवली म्हाडा वसाहतीतील पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या दोन एकर मैदानात, लवकरच माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ भव्य क्रीडा संकुल बनवण्याचे शिवधनुष्य नुकतेच शिवसेनेत सामिल झालेले परिसराचे नगरसेवक ईश्वर तायडे यांनी उचलले आहे. याचे उदघाटन शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते नुकतेच चांदिवली म्हाडा येथे पार पडले.

पवई, चांदिवली भागात मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानांची मोठी समस्या आहे. ज्या जागा मैदाने म्हणून राखीव आहेत त्यांची एकतर वाईट अवस्था आहे, किंवा त्यांच्यावर कोणीतरी अतिक्रमण करून बसलेले आहे. त्यामुळे मुलांना मैदानी खेळाचा प्रश्न नेहमीच सतावत असतो. मात्र तरुणाईच्या या प्रश्नाला समजत, चांदिवली प्रभाग क्रमांक १५१ चे नगरसेवक ईश्वर तायडे यांनी चांदिवली म्हाडा येथे पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या दोन एकर जागेत, मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे ठरवले आहे. शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते उदघाटन करत बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.

संपूर्ण मैदानाला सुरक्षा भिंत उभारून आतमध्ये जॉगिंग ट्रेक, चिल्ड्रेन पार्क, सोबतच कब्बडी, खो-खो, बास्केटबॉल, लॉंग जंप, व्होली बॉलसह विविध खेळांची सोय असणारे सुसज्ज असे हे क्रीडा संकुल असणार आहे.

खेळाची मैदाने उपलब्ध नसल्याने मुले मोबाईल, कॉम्प्युटरच्या आहारी गेल्याने त्यांची शारीरिक प्रगती खुंटली आहे. मुलांच्यात पुन्हा मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून परिसरात हे भव्य संकुल उभारले जात आहे” असे या संदर्भात बोलताना ईश्वर तायडे यांनी सांगितले.

या वेळी मार्गदर्शन करताना पोतनीस म्हणाले, “येथील नगरसेवकांचा शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेची ताकत वाढली आहे. केवळ नगरसेवकच नव्हे तर या विभागातून पुढील आमदार ही शिवसेनेचाच असेल. तायडे यांना सेनेत घेण्याचा आमचा निर्णय योग्य असून, त्यामुळे पुढील निवडणुकांची माझी चिंता मिटली आहे. तायडे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ उभारत असलेल्या क्रीडा संकुलामुळे तरुणाईला खेळाची आपली हक्काची जागा मिळू शकणार आहे आणि त्यांच्या या कार्यात शिवसेना नेहमी त्यांच्या सोबत आहे.”

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!