‘लॉस्ट सिटी ऑफ ड्रिम्स’च्या थीमवर रंगला चंद्रभान शर्मा महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव ‘ख्वाइश’

पवईतील चंद्रभान शर्मा महाविद्यालयाचा ‘ख्वाइश’ हा वार्षिक आंतरमहाविद्यालयीन महोत्सव १३ आणि १४ जानेवारी रोजी दणक्यात साजरा झाला. ‘लॉस्ट सिटी ऑफ ड्रिम्स’, एक भ्रामक जग जे केवळ विचारांमध्ये अस्तित्वात आहे आणि एक चक्रव्यूह आहे. या जगात आनंदाने जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते स्वीकारणे आणि त्याच्या शक्यतांचा शोध घेणे, या थीमवर हा महोत्सव साजरा करण्यात आला. या वर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, स्टार इव्हेंट्स, मीडिया इव्हेंट्स, गेम्स, स्पोर्ट्ससह विविध श्रेणींमध्ये २५ इव्हेंट्सचा समावेश होता. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात मुंबईसह महाराष्ट्रातील १०० पेक्षा अधिक महाविद्यालयांनी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये भाग घेतला, तर ३०००च्या वर विद्यार्थ्यांनी याला हजेरी लावत आनंद लुटला.

महोत्सवाची सुरुवात १३ जानेवारीला स्थानिक खासदार पूनम महाजन, विश्वस्त सौदामिनी शर्मा, प्राचार्या डॉ. प्रतिमा सिंग यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. महोत्सवाला दिपक जोशी, ऋषभ चढ्ढा, समेक्षा देशपांडे, अमीर सिद्दीकी आणि अद्रीजा शर्मा या प्रभावशाली सेलिब्रिटीची उपस्थिती होती.

चंद्रभान शर्मा महाविद्यालयाचा ख्वाइश हा वार्षिक आंतरमहाविद्यालयीन महोत्सव गेल्या १४ वर्षांपासून साजरा केला जात आहे आणि प्रत्येक वर्षी नवीन उंची गाठत आहे. महोत्सवात प्रामुख्याने ललित कला श्रेणीमध्ये फेस पेंटिंग, आगीशिवाय कुकिंग, मेहंदी, नेल आर्ट आणि रांगोळी कला यासारख्या कार्यक्रमांचा समावेश होता. तर परफॉर्मिंग आर्ट्स श्रेणीमध्ये बी-बॉयिंग, गायन, स्ट्रीट प्ले, बीटबॉक्सिंग, रॅपिंग, सोलो आणि ड्युएट परफॉर्मन्स आणि स्ट्रीट डान्सिंग सारख्या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. साहित्य कला श्रेणीमध्ये विद्यार्थ्यांनी कविता, शायरी आणि स्टँड-अप कॉमेडीचे सादरीकरण केले गेले. गेमिंग आणि क्रीडा विभागात रिंक फुटबॉल, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि आर्म रेसलिंग सारखे खेळ खेळले गेले. या महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधले ते फॅशन शो, बॉडीबिल्डिंग, मिस्टर आणि मिस ख्वाइश यांसारख्या इव्हेंटनी.

ख्वाइश तरुणांच्या आकांक्षांना मूर्त रूप देते, विद्यार्थ्यांना धैर्याने काम करण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची त्यांची क्षमता ओळखण्यासाठी प्रोत्साहित करते. हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि नवीन शक्यतांचा शोध घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो,” असे मत चंद्रभान शर्मा महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रतिमा सिंग यांनी व्यक्त केले.

“विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांचे आणि कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी हा महोत्सव एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरत आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी आणि समुदायाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांना एकत्र आणण्यास देखील महोत्सव मदत करतो”, असे यावेळी बोलताना महाविद्यालयाच्या विश्वस्त सौदामिनी शर्मा म्हणाल्या.

१४ जानेवारी रोजी डीजे नाईटने या महोत्सवाचा समारोप झाला, ज्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत डीजेच्या तालावर नृत्य केले.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!