पवई तलाव घाटावर छठ पूजा हर्षोल्हासात

उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा सण, सूर्य आणि त्याची पत्नी उषा यांना समर्पित असलेली ‘छठ पूजा’ पवईत हर्षोल्हासात साजरी झाली. पवई तलाव घाटावर हजारोच्या संख्येने  भाविकांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत छट पूजा साजरी केली. उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी विविध संस्थांकडून सोयी-सुविधा देण्यात पुढाकार दिसला.

यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या, आमदार नसीम खान यांच्यासह भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास ञिपाठी छट पूजेला उपस्थित होते.

या उत्सवात आनंद भरण्यासाठी मुंबई काँग्रेस कमिटीतर्फे पवई तलाव घाट ते हरिओम नगर, चैतन्यनगर, गोखलेनगर, सुर्यानगर सह परिसरात राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी मोफत तीनचाकीची (रिक्षा) सोय करण्यात आली होती.

हा धार्मिक सण एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव ठरत आहे. छठपूजेनिमित्त महिला उपवास करून सूर्याची उपासना करतात. यावेळी फळे तसेच गोडधोड नैवैद्य दाखवला जातो. अर्घ्य अर्पण करण्यासाठी पवई तलाव घाटावर येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. पूजा परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बँरिकेटिंग, विद्युत व्यवस्था, सूचना देण्यासाठी धवनिक्षेपक यंञणा आणि चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे पालिका एस विभाग आणि पवई पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!