भूमिगत मेट्रोच्या मागणीसाठी मुंबईकरांची पवई तलावावर मानवी साखळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारद्वारे सुरू केलेल्या अनेक पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेत निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या अनेक प्रकल्पांना लाल झेंडा दाखवलेला असतानाच मुंबईकरांनी उपनगरामधील भूमिगत मेट्रो कॉरिडोरच्या आपल्या मागणीवर जोर दिला आहे. याच मागणीसाठी शनिवारी (०८ डिसेंबर) मुंबईकरांकडून पवई तलाव भागात मानवी साखळी तयार करण्यात आली.

शनिवारी संध्याकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत मुंबईतील विविध संस्थाचे कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकर यांनी मेट्रो -२ बी (डी एन नगर ते मांडले), मेट्रो – ४ (वडाळा-ठाणे-कासारवडवली) आणि मेट्रो – ६ (स्वामी समर्थ नगर – विक्रोळी – पूर्व द्रुतगती मार्ग) या परिसरात सुरु असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला भूमिगत करण्याची मागणी केली आहे. पाठीमागील सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेले हे प्रकल्प नागरिकांची मते विचारात न घेता मंजूर करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकल्प निसर्गाला हानी पोहचवण्यासोबतच नागरिकांच्या सोयीचे न ठरता आणखी समस्या वाढवणारे असल्याचा दावा करत यांना भूमिगत करण्याची मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे.

पाठीमागील सरकारने आपल्या काळात या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. मात्र नवीन सरकार याचा विचार करत आहे. त्यामुळे आपल्या या मागणीला जोर देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांनी शनिवारी पवई तलावाच्या किनाऱ्यावर मानवी साखळी बनवली. आम्ही एकत्रित आहोत आणि आम्हाला भूमिगत मेट्रो हवी अशी यावेळी मागणी करण्यात आली.

या आठवड्याच्या सुरुवातीस सर्वोच्च न्यायालयाने एमएमआरडीएला ‘मेट्रो – ४’साठी झाडे तोडण्यापासून रोखले आहे. “आम्हाला नवीन सरकारच्या काळात मिळालेल्या या संधीचा वापर योग्य करायचा आहे. उपनगरात पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी आम्ही एकत्रित येत आहोत. मुंबईतील विविध मेट्रो प्रकल्पात हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. आरे कारशेडवर जर राज्य सरकार स्थगिती आणू शकत असेल, तर मेट्रो प्रकल्पात बाधित होणाऱ्या या झाडांच्या कत्तलीला रोखण्यासाठी सरकार आमची मागणी जरूर मान्य करेल”, असे यावेळी मानवी साखळीत सहभागी काही पर्यावरण प्रेमींनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

‘मेट्रो – ६’ला भूमिगत करण्याची मागणी करणाऱ्या फोरमचा भाग असलेल्या पवई येथील रहिवाशी सोनाली मिश्रा म्हणाल्या की, “मेट्रो-६ प्रकल्प ज्या भागातून जातो आहे तो भाग मेट्रोचा विचार करता बनवण्यात आलेला नाही. जेव्हीएलअर निर्मिती वेळी याचा कसलाही विचार झालेला नाही. येणारा मेट्रो प्रकल्प या मार्गावर असणाऱ्या नागरिकांसाठी मोठा त्रासदायक ठरू शकतो म्हणून आमचा एलेवेटेड मेट्रोला विरोध असून, हा प्रकल्प भूमिगत बनवावा अशी आमची मागणी आहे.

त्या पुढे म्हणाल्या, “नवीन सरकारने सुरुवातीला घेतेलेल्या काही निर्णयांना पाहता हे सरकार जनतेच्या हिताचे वाटते आहे. आम्ही लवकरच सह्यांची मोहीम राबवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमच्या मागणीचे पत्र सुद्धा देणार आहोत.”

मानवी साखळी ही मागणीसाठी व्यापक करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. अजून पर्यंत मेट्रोचे बरीकेडीग करण्या व्यतिरिक्त कोणतेच मोठे काम करण्यात आलेले नाही. भूमिगत मेट्रोचे ७०% पेक्षा जास्त काम पाठीमागील ४ वर्षात पूर्ण झाले आहे. तिथे अडचणी कमी जाणवत आहेत. मात्र एलेवेटेड मेट्रोचे याच काळात केवळ ५ ते १० टक्के काम सुद्धा झालेले नाही. त्यामुळे अजूनही आमच्याकडे वेळ आहे आमची भूमिगत मेट्रोची मागणी मान्य करून घेण्यास. निसर्ग वाचवण्यासोबतच मुंबईला एक योग्य आणि आवश्यक मेट्रो सुविधा देण्यास,” असे यावेळी बोलताना भूमिगत मेट्रोच्या चळवळीचे नेतृत्व करणारे नितीन किल्लावाला म्हणाले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!