हिरानंदानी परिसरात शिवसेनेतर्फे स्वच्छता मोहीम

फोटो: रमेश कांबळे

फोटो: रमेश कांबळे

स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखा १२२ तर्फे पवईतील हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवार, ८ जानेवारी रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार लांडे यांच्यासह, विवेक पंडित, शिवसेना शाखा १२२चे शाखाप्रमुख सचिन मदने, पालिका एस विभागातील घनकचरा विभाग, किटकनाशक विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचा कहर आता मुंबईमधून ओसरू लागलेला आहे. मात्र या विषाणूनी स्वछेतेचे महत्व पुन्हा एकदा पटवून दिले आहे. स्वतःच्या स्वछतेसोबतच परिसर स्वच्छतेचे महत्व सुद्धा अधिक आहे. याच विचाराने शिवसेना शाखा १२२तर्फ़े स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वाखाली हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

यावेळी पालिका कर्मचारी आणि शिवसैनिकांच्या मदतीने येथील रस्त्यांच्या स्वच्छतेसह, गटारे, नाले स्वच्छ करण्यात आले. परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये कोरोनाचा धोका अजून पूर्णतः संपला नसून, स्वछतेबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!