पवईत विविध कार्यक्रमांनी ७०वा संविधान दिन उत्साहात साजरा

देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पवईत विविध संस्था, संघटनांच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नटराज थिएटर्स मुंबई यांच्या तर्फे २६ नोव्हेंबर २०१९ रोजी ७० वा संविधान दिन “संविधान जपताय का?” हे पवईतील विविध भागात पथनाट्य सादर करून साजरा करण्यात आला. या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शक मास्टर पंकज दादा चाळके यांनी केले आहे. बाप-लेकी सारख्या नाटकाचे यशस्वी ७५ प्रयोग महाराष्ट्रात नटराज थिएटर्स मुंबईच्यावतीने करण्यात आले आहेत. ही सामाजिक बांधिलकी पुढे जपत सामाजिक विषयावर त्यांनी वर्दीतला देव माणूस आणि संविधान दिनानिमित्त संविधान जपताय का? असे संदेशात्मक पथनाट्य सादर करून एक भरकटत चाललेल्या समाजाला एक दिशा दाखवण्याचे काम केले आहे.

पवईतील महात्मा ज्योतिबा फुले नगर, चैतन्यनगर, सम्यक बुद्धविहार, जेतवन बुद्धविहार, विक्रोळीतील भिमटोला मित्र मंडळ टागोर नगर ३, पँथर नगर, भिममगर्जना मित्र मंडळ, प्रगती विद्यालय अशा विविध ठिकाणी कलाकारांच्या माध्यमातून संविधान जनजागृती करण्यात आली. चौकसभा व प्रास्ताविकतेचे सामुहिक वाचनही या वेळेस करण्यात आले.

सुमित गपाट, अनुष्का कांबळे, स्वप्नील शेळके, यश चंदनशिवे, हर्षद चक्रधरे, निखिल नाईक, अंकिता कुरकुटे, शशांक पाजवे, लक्ष्मीकांत यादव यांनी सादर केलेल्या या पथनाट्यातून जनजागृती करताना कलाकारांनी आपल्या कलेतून लोकांच्या काळजाचा ठाव घेतला.

नटराज थिएटर्स व त्यांच्या कलाकारांना वेळोवेळी मार्गदर्शन व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महेश सांवत आणि प्रतिक कांबळे नेहमीच कार्य करत असतात.

डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या माध्यमातून सुद्धा फुलेनगर येथे संविधान साक्षर दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नॅशनल लॉ कॉलजचे प्राध्यापक मिलिंद गवई यांनी संविधान या विषयावर आपले व्याख्यान दिले.

टायगर ग्रूप पवईचे विशाल खंडागळे, वैभव कांबळे व सहकारी यांच्यावतीने संविधानाची प्रास्ताविका सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (एमआयडीसी) अनिल कोळी व ज्ञानमंदिर विद्यालय पवई यांना भेट देत ७०व्या संविधान दिन साजरा करण्यात आला.

पवईतील भिम फाऊंडेशनतर्फे संविधान दिना निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

पवईतील भिम फाऊंडेशनतर्फे संविधान दिना निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

बुद्धिस्ट कल्चरल असोसिएशन तर्फे आयआयटी मुंबई येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

फ्रेंड्स गृप गोखलेनगर यांनी सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत संविधान दिन साजरा केला.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes