सायबर फसवणुकीत ५२ वर्षीय व्यक्तीने गमावले १.५८ लाख

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २०१७ पासून ते ई-वॉलेट वापरत आहे.

सायबर फसवणूकीच्या घटनेत एका ५२ वर्षीय प्रकल्प व्यवस्थापकाला १.५८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवई येथे रिअल इस्टेट कंपनीत नोकरीस आहेत. फसवणूक करणार्‍याने मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे तक्रारदार यांच्या फोनवर ताबा मिळवत त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

२०१७ पासून तक्रारदार ई-वॉलेट वापरत आहेत. २ सप्टेंबर रोजी त्यांना ई-वॉलेट कंपनीकडून आलेला दर्शवणारा एक संदेश प्राप्त झाला होता. त्यांचे तपशील तपासले गेले नसल्यामुळे खाते संपुष्टात येणार आहे असा मजकूर त्यात होता. केवायसीद्वारे वैयक्तिक माहितीची पडताळणी करून आपण आपले खाते पुढे चाली ठेवू शकता असे सुद्धा त्यात म्हटले होते.

‘७ सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा अजून एक संदेश मिळाला, ज्यात तुम्ही तुमच्या खात्याची पडताळणी केली नाहीत तर तुमचे खाते बंद करण्यात येईल. असा उल्लेख करण्यात आला होता’, असे याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले.

‘तक्रारदार यांनी संदेशात दिलेल्या नंबरवर कॉल केला असता, संभाषणा दरम्यान समोरील व्यक्तीने कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत तक्रारदार यांना एक एप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. या एप्लिकेशनमुळे तक्रारदार यांच्या फोनचा कंट्रोल रिमोट एक्सेसद्वारे समोरील व्यक्तीकडे गेला होता.’ पवई पोलिसांनी सांगितले.

अॅपद्वारे तक्रारदार यांना १०० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर खरेदी करण्यास सांगितले. जेव्हा तक्रारदाराने डेबिट कार्डच्या तपशीलासह सीव्हीव्ही क्रमांक टाकला तेव्हा आरोपींनी तक्रारदाराच्या खात्याची संपूर्ण माहिती जमा करत त्यांच्या खात्यातून १.५८ लाख रुपये चोरी केले.

व्यवहारानंतर लगेचच त्यांच्या बँकेने फोन करून त्यांनी कोणता व्यवहार केला आहे का? याबाबत माहिती मागितली. मात्र तक्रारदार यांनी असा कोणताच व्यवहार केले नसल्याचे सांगताच बँकेने तक्रारदार यांचे खाते ब्लॉक केले, ज्यानंतर त्यांनी पवई पोलिस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला आहे.

‘आमचा तपास सुरू आहे आणि लवकरच आम्ही दोषीला पकडू,’ असे एका तपासी अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!