डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले

४२ वर्षीय पवईकराच्या खात्यातील १ लाख ५ हजार रुपयांवर कार्ड क्लोनिगच्या माध्यमातून सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे राहणारे राम शर्मा (४२) हे सुतारकाम करतात. त्यांचे इंडीयन बँकेच्या भांडूप शाखेत बचत खाते आहे. या खात्याच्या डेबिट कार्डच्या साहय्याने ते आवश्यक तेव्हा खात्यातील रक्कम काढत असतात.

पाठीमागील आठवड्यात ते आपल्या घरी असताना त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या ९ आर्थिक व्यवहारातून प्रत्येकी १० हजार रुपये असे ९० हजार रुपये वजा झाल्याचा संदेश त्यांना मोबाईलवर प्राप्त झाले.

“त्यांनी त्वरित आपले एटीएम कार्ड आपल्याजवळ आहे का हे तपासून पाहिले, ते त्यांच्या जवळच होते. कार्ड आपल्याजवळ आहे कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही दिलेली नसताना खात्यातून पैसे गेल्याने शर्मा हडबडले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते बँकेत गेले मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना माहिती मिळू शकली नाही. १० तारखेला सकाळी पुन्हा खात्यातून कोणीतरी १५ हजार रुपये काढल्याचा मॅसेज त्यांना मोबाईलवर मिळताच त्यांनी पुन्हा बँक गाठली. यावेळी बँकेने त्यांना कोणीतरी तुमची डेबीट कार्डची गोपनीय माहिती चोरी करुन खात्यातील १ लाख ५ हजार रुपये काढल्याचे सांगितले.

यासंदर्भात शर्मा यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भांडूप पोलिसांनी हा अर्ज पवई पोलिसांकडे वर्ग केला आहे. पवई पोलिस याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

3 Responses to डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले

  1. Bhupendra Shah November 26, 2019 at 4:58 am #

    पवई आवर्तन पवईकरांना चांगला माहिती देत आहे, माय पवई आणि प्लॅनेट पवई सारखे ईतर बातम्या चा समावेश करण्यात फार गरजेचं आहे,

    • आवर्तन पवई November 27, 2019 at 3:05 pm #

      आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही तुम्ही उल्लेख केलेल्या बातम्यांचा समावेश पुढील काळात नक्की करू.

      धन्यवाद
      वृत्तसंपादक

    • आवर्तन पवई April 13, 2020 at 9:58 am #

      तुम्ही वर्णन केलेल्या दोन्ही वृत्तपत्र यांचे आपले एक अस्तित्व आहे. प्रत्येकाचे बातम्यांचे आपले एक नियमन आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले वेगळेपण जपणे आवश्यक आहे. या वेगळेपणामुळेच वाचक आम्हा सर्वाना पसंती देत आहेत. तरीही वाचकांच्या मागणीला पाहता त्याच्याशी जुळतील अश्या बातम्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

      धन्यवाद
      वृत्तसंपादक

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!