परिमंडळ १० पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते सोमवारी (२१ मार्च) राजभवन, मुंबई येथे आयोजित समारंभात ९७ पोलीस अधिकारी (police officers) आणि पोलीस कर्मचाऱ्यांना (police persons) शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदके (President’s Police Medals for Gallantry), गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके (President’s Police Medals for Meritorious Service) आणि पोलीस पदके (Police Medals for Meritorious Service) प्रदान करण्यात आली. यावेळी परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी (DCP zone-X Maheshwar Reddy) यांना त्यांनी गडचिरोली येथे केलेल्या उल्लेखनीय कामगिरी आणि शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, पुरस्कार विजेते पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी दहा पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्यपदक, तर आठ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदके प्रदान करण्यात आली. तर ७९ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस उपायुक्त डॉ एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे (उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक), मिठू नामदेव जगदाळे (सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर ग्रामीण), अविनाश कांबळे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली), पोलीस कॉन्स्टेबल सुरपत वड्डे, पोलीस नाईक वसंत आत्राम (गडचिरोली), पोलीस कॉन्स्टेबल आशिष हलामी (गडचरोली), पोलीस कॉन्स्टेबल विनोद राऊत (गडचरोली), पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार आंग्रे (गडचिरोली) आणि पोलीस कॉन्स्टेबल हमित विनोद डोंगरे (गडचिरोली) यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल शौर्य पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आणि संजय सक्सेना (प्रधान सचिव गृहनिर्माण) हे राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्तकर्त्यांमध्ये होते.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!