आयआयटी मुंबईचे विलगीकरण केंद्र रद्द

आयआयटी मुंबईचे विलगीकरण केंद्र रद्द

पवईतील दोन ठिकाणी सी कॅटेगरीमधील बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी केंद्र उभी करण्याची लगबग सुरु होती. आयआयटी पवई आणि रहेजा विहार येथील प्रशिक्षण केंद्रात हे विलगीकरण कक्ष बनवण्यात येणार होते. मात्र ही लगबग सुरु असतानाच आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बनवण्यात येणारे विलगीकरण केंद्र शासनातर्फे रद्द करण्यात आल्याचे तहसीलदार मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले आहे.

जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने (कोव्हीड १९) भारतात प्रवेश केला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ४१५च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मिळून सध्या ८९ पॉजीटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात पोहचलेल्या या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊले उचलत ठिकठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी सेंटर उभी करण्याची तयारी सुरु केली होती. पवईत दोन ठिकाणी अशी विलगीकरण केंद्र बनवण्यात येणार होती. मात्र आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमधील चार इमारतीत बनवण्यात येणाऱ्या विलगीकरण केंद्राला विद्यार्थी आणि नॉन-अ‍ॅकॅडमिक स्टाफ असोसिएशन (नासा) यांनी विरोध दर्शवला होता.

“सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या तीव्र विरोधात आम्ही होतो, कारण या निर्णयामुळे परिसरातील रहिवाशी आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याने आमचा विरोध असल्याचे आम्ही बैठकीला बोलावले असता मांडले असते” असे याबाबत बोलताना नासाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नासातर्फे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारच्या सचिवालय यांना पत्रव्यवहार करत आपला विरोध दर्शवत हा निर्णय बदलण्याची मागणी केली होती.

सुरुवातीला मुंबईतील विविध भागात विलगीकरण केंद्र बनवण्याची शासनातर्फे तयारी सुरु होती. मात्र नंतर शासनाने विलीगीकरणा संदर्भात वेगळे निर्णय घेतल्याने आयआयटी मुंबई येथील केंद्र रद्द केले असल्याचे तहसीलदार मिलिंद बोरीकर यांनी याबाबत बोलताना सांगितले.

पवईतील रहेजा विहार येथील प्रशिक्षण केंद्रात बनवण्यात येणाऱ्या विलगीकरण केंद्राबाबत अजून कोणतीच अधिकृत माहिती मिळून आलेली नाही. मात्र या ठिकाणी अध्याप कोणालाच ठेवले नसल्याचे समोर येत आहे.

आयआयटी पवईत ४० रुग्ण ठेवल्याची अफवा

आयआयटी मुंबईत काम करणारे हाऊसकिपिंग कामगार सहीत अन्य विभागात काम करणाऱ्या काही लोकांकडून या कॅम्पसमध्ये ४० रूग्ण आणण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. आमची ड्युटी तिथेच आहे असं ‘डंके की चोट पर’ सांगितले जात आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संदर्भात आयआयटी मुंबई जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती विचारली असता त्यांनी या माहितीला नाकारले आहे.

सोशल माध्यमातून किंवा लोकांच्या माध्यमातून फिरणाऱ्या माहितीवर विश्वास न-ठेवता खात्री अधिकृत माध्यमातून करून घेण्याचे आश्वासन यावेळी पवई पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी अशा अफवा पसरवू नये असे आवाहनही यावेळी करण्यात येत आहे.

FOR ENGLISH NEWS CLICK HERE

, , , , , , , , , , , , , , , , ,

Trackbacks/Pingbacks

  1. आयआयटी पवईत ४० रुग्ण ठेवल्याची माहिती खोटी – जनसंपर्क अधिकारी » - March 23, 2020

    […] येथील विलगीकरण कक्ष रद्द केल्यानंतर आयआयटी पवईत ४० रुग्णांना […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!