पवईत पावसामुळे संरक्षक भिंती कोसळण्याच्या अवस्थेत

पंचऋतू येथील पडलेला भिंतीचा भाग

पंचऋतू येथील पडण्याच्या अवस्थेत असणारी भिंत

गेला आठवडाभर मुंबईत पडलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. आता  पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी त्याचे चटके मात्र अजूनही सोसावे लागत आहेत. पवई, चांदीवली, साकीनाका भागातील अनेक संरक्षक भिंतींना पावसामुळे तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत.पवईतील भक्तांनी कॉम्प्लेक्समधील पंचऋतू येथील गुंडेच हिल इमारती समोरील संरक्षक भिंत कमकुवत होत पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. चांदीवली-हिरानंदानीला जोडणाऱ्या या कॉम्प्लेक्समधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. कोणत्याही क्षणी भिंत रस्त्यावर कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. पावसामुळे ही भिंत रस्त्यावर पडेल की काय या धास्तीनेच येथून प्रवास करणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या संदर्भात आम्ही सोसायटी मॅनेजमेंट सोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सुरक्षा भिंतीचे बांधकाम विकासकाने कमकुवत केले होते, त्यामुळे जोरदार पावसात भिंतीचा वरील काही भाग ढासळला होता. विकासकाने अजून कन्वेयंस दिले नाही, प्रॉपर्टी अजूनही त्यांच्याच ताब्यात आहे. आम्ही विकासकाला तक्रार केली आहे, मात्र तो पुढे येत नसल्यामुळे अखेर सोसायटीच्या फंडातून आम्ही या भिंतीच्या पुनर्निर्मितीचे काम सुरु करत आहोत.”
मँगो गार्डन जवळील कमकुवत संरक्षक भिंत

हरिओमनगर जिजामाता सोसायटी) येथील धोकादायक संरक्षक भिंत

तर दुसऱ्या ठिकाणी हरिओमनगरला (जिजामाता सोसायटी) जाताना मँगो गार्डन जवळील संरक्षक भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत धरून ये जा करावे लागत आहे. महानगरपालिकेने याकडे वेळीच लक्ष घालून लवकरात लवकर दखल घ्यावी अशी येथील रहिवाशांनी मागणी केली आहे.

पालिका अधिकारी पहाणीनंतर स्थानिकांकडून माहिती घेताना.

याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी येऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. मात्र ही महानगरपालिकेची जबाबदारी नसून, ज्यांच्या मालकी हक्काची जागा आहे, त्यांनीच या धोकादायक भिंतीची दुरुस्ती करावी असे महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी सांगत हात झटकले आहेत. या ठिकाणची भिंत ही धोकादायक अवस्थेत असल्यामुळे येथील रहिवाशांना महानगरपालिकेची नोटीस देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes