पवईला डेंग्यूचा विळखा, पालिकेकडून नागरिकांमध्ये जनजागृती

@रविराज शिंदे

dengu-powaiवामानातील बदलामुळे मुंबईत साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पवईत सुद्धा डेंगू, मलेरिया सारख्या आजारांनी तोंड वर काढले आहे. पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल, निहाल हॉस्पिटल, पवई हॉस्पिटल,महात्मा फुले महानगर पालिका रुग्णालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर महानगर पालिका रुग्णालयामध्ये डेंग्यूने ग्रस्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. याआजारांबाबत महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाकडून विशेष जनजागृती अभियान राबवले जात आहे.नागरिकांनी या जनजागृती अभियानात सहभाग नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन महानगर पालिका एस विभागाकडून करण्यात आले आहे.

महानगरपालिका ‘एस’ विभागाच्या हद्दीत येणाऱ्या पवई,भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग येथे एकूण ६ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, २५० संशयित रुग्णांची नोंद महानगरपालिकेकडे आहे.

“विभागात आमच्या तर्फे दररोज डेंगू, मलेरिया सारख्या आजारांबाबत जनजागृती केली जात आहे. आमचे अधिकारी पाहणीसाठी गेले असता, अनेक घरात आम्हाला डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांच्या अळ्या व डास आढळून आले आहेत. या डासांचा व अळ्यांचा प्रादुर्भाव जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असतो,म्हणूनच आम्ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून याबाबत जनजागृती सुरु करत नागरिकांना सावध करण्याचे काम केले होते. मात्र लोकांच्या हलगर्जीपणामुळे आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्या घरांमध्ये अशा अळ्या आणि डास आढळून आले आहेत, त्यांना आम्ही तात्काळ नोटीस पाठवली आहे त्यात काही नगरसेवकही आहेत” असे आवर्तन पवईशी बोलताना एस विभाग महानगरपालिकेचे वैदयकीय अधिकारी डॉ जितेंद्र जाधव यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!