एड्स जनजागृतीसाठी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये वादविवाद स्पर्धेचे आयोजन

१ डिसेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जागरूकता उपक्रम राबविण्यात आले. परंतु पवई येथील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयाने जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात एक पाऊल पुढे टाकले. ‘एचआयव्ही/ एड्स साथीची समाप्ती’ या विषयावर शालेय मुलांची वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेमध्ये मुंबई शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. पवईतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल व ठाणे येथील हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलमधील विद्यार्थी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या देबोत्तम लाहिरीने या स्पर्धेत बाजी मारली.

१ डिसेंबरला देशभर साजऱ्या होणाऱ्या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत याच्या बद्दल जनजागृती करण्यासाठी हिरानंदानी हॉस्पिटल नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते. कधी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केलेल्या कलाकारांच्या माध्यमातून, कधी इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांच्या माध्यमातून तर कधी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मुंबईकरांच्यात याबाबत जनजागृती केली जाते.

“हिरानंदानी रुग्णालयात आम्ही २००४ पासून दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. आमचे लक्ष लोकांना शिक्षित करणे, जनजागृती करणे आणि या भयानक रोगाच्या निर्मूलन प्रक्रियेमध्ये ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांचा सहभागातून जनजागृती करणे हा आहे. यामुळे अशा व्यक्तींकडे बघण्याबद्दल योग्य दृष्टीकोन देखील वाढविला जातो या उद्देशाने आम्ही हा पुढाकार घेतो. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देताना भेदभावाविरुद्ध लढा देण्याबद्दल प्रेरणा देणे हा उद्देश आहे,” असे या उपक्रमाविषयी बोलताना डॉ. एल एच एच हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी डॉ सुजित चटर्जी म्हणाले.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes