चैतन्यनगरमध्ये पाण्याच्या पाईप बदलण्याच्या, गटार सफाईच्या कामाला सुरुवात

मुंबईत उन्हाच्या झळा वाढू लागलेल्या असतानाच, आता काही महिन्यांवर पावसाला ऋतू येवून ठेपल्याने नगरसेवक निधीतून चैतन्यनगर भागात नवीन ४ इंची पाईपलाईन टाकण्याचे तसेच गटारात असणाऱ्या पाण्याच्या पाईप बाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासोबतच गटार साफ करण्याचे काम सुद्धा सुरु झाले आहे.

पावसाला सुरु झाला की गटारांची साफ सफाईचे काम करण्यात आले नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साठते. पवई परिसर सुद्धा त्याचाच एक भाग आहे. पवईतील ‘ओल्ड पवई’ म्हणून ओळख असणाऱ्या आयआयटी रहिवाशी भागात प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी तर साठ्तेच शिवाय गटारातील घाण बाहेर आल्याने दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरते.

सत्ता पालट करत २०१७ सालच्या पालिका निवडणुकीत पवईमधून निवडून आलेल्या आणि नामंकित झालेल्या दोन्ही नगरसेवकांनी आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी मात्र स्थानिकांच्या अशा अनेक प्रश्नांना जातीने लक्ष घालत काम सुरु केले आहे आणि याचाच एक भाग म्हणून चैतन्यनगर भागात गटारात असणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन सध्या गटारातून बाहेर काढण्याचे, शिफ्ट करण्याचे तसेच ४ इंची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

“लोकांच्या गटारे तुंबण्याच्या समस्यांचे जेव्हा आम्ही बारकाईने परीक्षण केले तेव्हा आमच्या लक्षात आले की, अनेक गटारांच्या आतून पिण्याच्या पाण्याच्या पाईप जात आहेत. या पाईपांमध्ये कचरा अडकून पडत असल्याने गटारे तुडुंब भरत आहेत, म्हणून आम्ही यांना बाहेर काढत शिफ्ट करत आहोत. आवश्यकता असेल तिथे ४ इंची पाईप सुद्धा टाकत आहोत” असे याबाबत बोलताना भाजपा वार्ड अध्यक्ष (१२२) विलास सोनी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “गटारातून जाणाऱ्या पाईपमुळे त्या फुटल्यास किंवा काही खराबी आल्यास घाण पाण्याचा पुरवठा घरांमध्ये होत असे. त्यामुळे अनेक लोक आजारी पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. मात्र आता पाण्याच्या पाईपलाईन बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवल्याने या समस्येसह अनेक समस्यांपासून नागरिकांची सुटका झाली आहे.”

आवर्तन पवई इम्पॅक्ट: चैतन्यनगरमधील कचऱ्याचा प्रश्न सुटला

चैतन्यनगर येथील मिश्रा डॉक्टरांच्या समोरील भागात महिनाभर रस्त्यावर गटारातून काढलेला कचरा पडला होता. याबाबत ‘आवर्तन पवई’ने चैतन्यनगरमधील कचऱ्याच्या प्रश्नामुळे नागरिक त्रस्त या मथळ्याखाली बातमी करत पालिका आणि स्थानिक नगरसेवक यांचे या समस्येकडे लक्ष वेधले होते. हा कचरा आता हटवण्यात आला असून, सध्या सुरु असणाऱ्या कामात भराव म्हणून त्याचा वापर केला गेला आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!