पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड

साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’.

साकीनाका वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या कारवाई वेळी वाहने टोईग करताना.

पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी साकीनाका वाहतूक विभागाच्यावतीने शाळेच्या भरण्या आणि सुटण्याच्या वेळेत शालेय आवारात आणि मुख्य रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आजपासून (गुरुवार, २५ जुलै २०१९) सुरु करण्यात आलेल्या या कारवाईच्या पहिल्याच दिवशी जवळपास १२ मोठ्या वाहनांवर साकीनाका वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली.

आदर्शनगर – विक्रोळी जोडणारा मेट्रो ६ प्रकल्पाचे काम पवईत जेव्हीएलआरवर सुरु आहे. मेट्रोच्या कामामुळे आधीच व्यस्त जेव्हीएलआरवर वाहतूक कोंडीचा दबाव आल्याने अनेक वाहनचालक चांदिवली, हिरानंदानी, आयआयटी मार्गे बाहेर पडणे पसंत करतात. यामुळे हिरानंदानी, चांदिवली सारख्या भागात वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. अशातच या भागात असणाऱ्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना घेवून येणाऱ्या शालेय बसेस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्या शाळेजवळील रस्त्यांवर निर्धास्तपणे पार्क केल्या जात असल्याने सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत संपूर्ण पवई वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकून जाम होते.

वाहतूक पोलीस पोद्दार स्कूल प्रशासनासोबत चर्चा करताना.

शालेय वेळात पवईच्या विविध भागात होणाऱ्या या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी विविध माध्यमातून वाहतूक विभागाला तक्रारी दिल्या होत्या. अनेक शाळांच्या प्रशासनाने सुद्धा यासंदर्भात तक्रारी दिल्या आहेत. पवई इंग्लिश हायस्कूल प्रशासन आणि पालक-शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारावर आज या समस्येशी निगडीत बैठक घेण्यात आली होती. यावेळी साकीनाका वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन जगदाळे, शाळेच्या तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका आणि पालक-शिक्षक संघटनेतर्फे श्रीनिवास त्रिपाठी (नामनिर्देशित नगरसेवक), बलवीर सिंग, चंद्रकांत शुक्ला उपस्थित होते.

शाळा आणि पालकांतर्फे मांडण्यात आलेल्या या समस्येनंतर साकीनाका विभागातर्फे शालेय वेळेत (दुपारी १२ ते १, संध्याकाळी ५.३० – ६.३०) शाळेच्या आवारात दोन्ही बाजूला १०० मीटर भागात आणि मुख्य रस्त्यावर वाहने पार्क करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. लवकरच या संदेशाचे बोर्ड परिसरात लावले जाणार असून, या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. सदर आदेश हिरानंदानी आणि आयआयटी भागात असणाऱ्या सर्व शाळांच्या परिसरात लागू होणार आहेत. पालकांनी शालेय वेळेत आपली वाहने शाळेच्या आवारापासून लांब सुरक्षित अंतरावर पार्क करून आपल्या पाल्याला शाळेत आणावे अशी विनंती शाळेच्यावतीने करण्यात आली आहे.

हिरानंदानी रुग्णालय, पोद्दार शाळेजवळ नो पार्किंगमध्ये पार्क गाड्यांवर वाहतूक अधिकारी कारवाई करताना.

“आम्ही सर्व शाळांना त्यांच्या शालेय वाहनांना आणि वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक वॉर्डन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शालेय वेळेत वाहतूक विभागातर्फे परिसरात गस्त घातली जाणार आहे. आजपासून आम्ही परिसरात उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईस सुरुवात केली आहे,” असे याबाबत बोलताना साकीनाका विभागाचे सपोनि नितीन जगदाळे यांनी सांगितले.

“थोड्याच दिवसात पालिकेतर्फे ‘नो पार्किंग झोन’चे बोर्डस ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, त्यानंतर पालिकेच्या नियमानुसार रुपये ५००० आणि अधिक अशा प्रकारे दंड वसुली केली जाणार आहे,” असेही एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

हिरानंदानी हॉस्पिटल आणि पोद्दार स्कूल भागात नो पार्किंग आणि दुहेरी रांगेत उभ्या वाहनांवर सुद्धा यावेळी कारवाई करण्यात आली. यावेळी पोद्दार शाळेचे जनरल मनेजर गणेश शिंदे यांनी यावेळी बोलताना आम्ही सुद्धा येथे वाहने उभी राहत असून, शालेय बसेस येण्या-जाण्यास अडथला निर्माण होत असल्याबाबत तक्रार केली असल्याचे सांगितले. मात्र विद्यार्थ्यांना घेवून येणाऱ्या खाजगी स्कूल बसेस आणि पालकांना तुम्ही काही सूचना केल्या आहेत का?? त्यांच्यामुळेच सर्वात जास्त वाहतूक कोंडी निर्माण होते असे सांगितले असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले.

यावेळी बलबीर सिंग आणि चंद्रकांत शुक्ला यांनी शाळेला पाठीमागून पर्यायी मार्ग दिला आहे, मात्र त्याचा वापर होत नसून, सर्व वाहने पुढच्या मार्गाने आणल्याने वाहतूक कोंडी वाढत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनात आणून दिले.

आयआयटी येथे वाहतुकीस अडथला निर्माण करणाऱ्या मुख्य रस्त्यावर पार्क वाहनांवर करण्यात आलेली कारवाई.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड

  1. Atin mhatre July 26, 2019 at 6:08 am #

    Excellent! This was very much required. No parking boards should be installed immediately. Also, BMC should take action on hawkers using roads and footpaths. Hawkers illegally with connivance of BMC officer’s and local politician’s occupy the nessaary infrastructure and conveniences which were built with taxes collected from our hard earned incomes. Let us all Stop this nonsense forever.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!