पाणीपुरवठा करणार्‍या तलावात ऑक्टोबर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा

पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मात्र या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरात येत नाही.

विहार तलावातील पाणीसाठा  – फोटो: संतोष सागवेकर

२०२० वर्षात सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने (IMD)  वर्तवला होता. या अंदाजानुसारच पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच आवश्यक तितका पाऊस होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडला आहे.

महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील आकडेवारी पाहिल्यास जुलै महिन्याच्या सुरुवातीला या महिन्यासाठी अपेक्षित ६०% पाऊस झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. १३ जुलैपर्यंत जवळपास ३.३९ दशलक्ष लिटर पाणी तलावात जमा झाले आहे. ज्याला पाहता सध्याचा उपलब्ध पाणीसाठा हा ऑक्टोबर मध्य पर्यंत पुरेल इतका असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी कपातीची चिंता सतावण्याची शक्यता खूपच कमी आहे.

मुंबईत सतत तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे पवईतील पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मात्र या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरात येत नाही.

अजूनही मान्सूनचे काही महिने अजून बाकी असल्याने तलाव पूर्ण भरतील अशीही आशा आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवार १६ जुलैपर्यंत मुंबई, ठाणे आणि रायगडमधील अनेक भागात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी सकाळी मुंबईत काही वेळापुरत्या पावसाच्या जोरदार सरी आलेल्या आहेत, मात्र मुसळधार पाऊस झालेला नाही. गुरुवारी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो का हे पाहावे लागेल.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!