पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पवई चांदिवलीत विकास कामांचे उदघाटन

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे, मा. नगरसेवक ईश्वर तायडे, मा. नगरसेविका आकांक्षा शेट्टे, मा. नगरसेवक सोमनाथ सांगळे, शिवसैनिक शिवा सूर्यवंशी, शाखाप्रमुख सचिन मदने, युवा विभाग अधिकारी मनोज (बालाजी) सांगळे, उपशाखाप्रमुख विजय कुरकुटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पवई आणि चांदिवली परिसराचा विकास पाठीमागील काही वर्षांपासून झपाट्याने होत आहे. मोठ्या प्रमाणात वाढणारी लोकसंख्या आणि होणारा विकास लक्षात घेता नागरी सुविधांची आवश्यकता सुद्धा वाढू लागली आहे. हेच लक्षात घेता स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्यावतीने आणि पाठपुराव्याने चांदिवली आणि पवई परिसरात अनेक विकास कामांना वेग आला आहे.

चांदिवली येथील संघर्षनगर परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातर्गत हजारो कुटुंबाना हक्काचे घर मिळाले आहे. हळूहळू या परिसरातील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, गेल्या वर्षभरात येथील सगळ्या अंतर्गत रोडचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. तसेच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जाणवणाऱ्या पाण्याच्या टंचाईचा विचार करता याच परिसरात १४ लाख लिटर भूमिगत पाण्याची टाकी बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांनी रविवारी नारळ फोडून केला.

मुंबई म्हणजे सर्व समाजाच्या आणि धर्माच्या लोकांचे हक्काचे ठिकाण मानले जाते. येथे सर्वच जाती धर्माची लोक एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या सर्वासाठी योग्य धार्मिक स्थळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, पवई येथील लुम्बिनी बौद्ध विहाराच्या विस्तारासोबतच समाजकल्याण केंद्र उभारण्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

पवई, रामबाग येथील स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण आणि विकास यासाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. या स्मृती स्थळाचे विस्तारीकरण आणि परिसराच्या डागडुजीसह सुशोभिकरण करण्याच्या कामाची सुरुवात रविवारी आदित्य ठाकरे यांनी नारळ फोडून केली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!