पवईतील सावंत कुटूंबाची सामाजिक बांधिलकी, नेत्रदानातून कुटूंब प्रमुखाला मृत्यूनंतरही ठेवले जिवंत

@ रविराज शिंदे

पवईतील महात्मा फूलेनगरमध्ये राहणारे सुनिल मनोहर सावंत (४५) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. परिवारावर कुटुंबप्रमुख हरवल्याने दुखाचा डोंगर कोसळला असतानाही धीर धरत सावंत कुंटुंबियांनी सुनिल यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

सुनिल सावंत पवईतील फूलेनगरमध्ये आपल्या पत्नी, दोन मुलं-मुलींसोबत राहत. रोजंदारीवर पेंटिंगचं काम करणाऱ्या सुनिल यांना मागील आठवड्यात आजाराने कवेत घेतले. त्यांच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू होते. दिवसेंदिवस प्रकृती खालावत गेल्याने सुनिल यांनी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले. वाचण्याची शक्यतेची कमतरता पाहता सुनिल यांचा मुलगा, पत्नी यांनी त्यांचे डोळे गरजूला देण्याचा निर्णय घेतला.

‘वडीलांच्या निधनानंतर आम्ही पोरके झालो आहोत, मात्र माझे वडील नेत्ररुपाने निरंतर जीवंत राहतील, या एकमेव उदिष्टाने आम्ही कुटुंबियांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला’ असे सुनिल यांचा मुलगा विशाल सावंत याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

सावंत कुंटुंबाच्या नेत्रदानाच्या निर्णयामुळे दोन अंध लोकांना याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे सर्वत्र या निर्णयाचे स्वागत होत असून, सावंत कुटुंबाचे कौतुक होत आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!