आयआयटीजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण

आयआयटी  मेनगेटजवळ काल (शुक्रवारी) रात्री ७.३० वाजता झालेल्या अपघातात एका इसमाला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली. संजय सदानंद मयेकर (४३) असे या मृत इसमाचे नाव आहे. ओल्या रस्त्यावरून मोटारसायकल घसरून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे. पवई पोलीस त्याला चिरडणाऱ्या अज्ञात वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयेकर हे कल्याण येथील रहिवाशी असून, अंधेरी येथील कॅपिटल प्लॉट नामक कंपनीत फायनान्स मॅनेजर म्हणून कामकाज पाहतात. शुक्रवारी संध्याकाळी कामावरून सुटल्यावर आपली मोटार सायकल क्रमांक एमएच ०५ बीटी ७६९१ वरून घरी परतत असताना आयआयटी मेनगेट, बाटा शोरूमजवळ त्यांची मोटारसायकल ओलसर रस्त्यावरून घसरली आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाखाली आल्याने त्यांच्या डोक्यावरून ते वाहन गेल्याने ते गंभीर रित्या जखमी झाले.

पवई पोलिसांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरानी घोषित केले. मयेकर यांचा परिवार गणपती निमित्त गावी गेला असून, त्यांचे बंधू संतोष मयेकर यांनी ओळख पटवत शव ताब्यात घेतले आहे.

अपघातानंतर वाहनासह वाहन चालक पळून गेला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे वाहनचा शोध सुरु असल्याबाबत पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!