एनटीपीसीजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

वईतील जेव्हीएलआरवर (आदी शंकराचार्य मार्ग) एनटीपीसी सिग्नलवर एक भीषण अपघात होऊन, एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना काल (सोमवार) दुपारी घडली. रामसंजीवन राजकुमार जैस्वाल (२६) असे या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी मुंबईतील शिवाजीनगर भागात राहणारा जैस्वाल आपल्या अजून एक मित्रासोबत कामानिमित्त मोटारसायकलवरून जोगेश्वरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी पाण्याच्या टॅंकरखाली आल्याने हा अपघात घडला.

“जैस्वाल जेव्हीएलआरवरून जात असताना एनटीपीसी सिग्नल येथे त्याच्या बाजूने भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनामुळे दचकल्याने, त्याचा तोल जावून (एमएच ०४ ईवाय ७६९६) पाण्याच्या टॅंकरखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“अपघातानंतर टॅंकरचालक पळून गेला आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे, हायगयीने गाडी चालवण्याचा गुन्हा नोंद करून आम्ही त्याचा शोध घेत आहोत, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उप-निरीक्षक माने यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes