छळवणूकीला कंटाळून महिलेचा मुलांसह विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न

यआयटी, गरीबनगर येथे राहणाऱ्या एका महिलेने स्वतःसह आपल्या दोन मुलांना विष देवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री पवईमध्ये घडली आहे. तिघांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रेचाळीस वर्षीय गीता वाघमारे (बदलेले नाव) पवईतील गरीबनगर भागात आपले पती प्रवीण, सासू आणि दोन मुले वय वर्ष चार आणि पाच सोबत राहत असून, पवईमधील एका मॉलमध्ये नोकरी करते.

२०११ साली लग्नानंतर सासू आणि पती यांच्याकडून त्यांचा सतत मानसिक आणि शारीरीक छळ सुरु होता. याच जाचाला कंटाळून रविवारी तिने सॉफ्ट ड्रिंकमधून मुलांना आणि स्वतः विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला.

“शनिवारी सासू सोबत तिचे किरकोळ भांडण झाल्यानंतर तिने घरी परतत असताना दुकानातून सॉफ्ट ड्रिंक व उंदीर मारण्याचे औषध घेतले होते”असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी तिघांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पवई पोलिसांकडून मिळत आहे.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes