पवई चैतन्यनगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग

@प्रतिक कांबळे

पवईमधील चैतन्यनगर येथील चाळसदृश परिसरात चाळींच्या घराबाहेर लावलेल्या घरगुती मिटर बॉक्सला आग लागल्याची घटना, गुरुवार १५ सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या मदतीने काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली.

अदानी कंपनीचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची तपासणी केल्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली.

, ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: