ज्ञानमंदीर शाळेच्या मीटर बॉक्सला आग; विद्यार्थी सुखरूप

रविराज शिंदे, रमेश कांबळे

पवईतील आयआयटी माता रमाबाई नगर भागात असणाऱ्या ‘ज्ञानमंदीर विद्यालय’ शाळेच्या मीटर बॉक्सला आग लागल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. शाळेच्या पाठीमागील बाजूस हा मीटर बॉक्स असल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही. शाळेतील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवांनाच्या साहय्याने विद्यार्थ्यांना त्वरित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळता आला.

सोमवारी मरोळ भागात असणाऱ्या इएसआयसी रुग्णालयात गलथान कारभारामुळे लागलेल्या आगीत ११ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेत एका पवईकराला आपले प्राण गमवावे लागले आहेत तर एक महिला जखमी झाली आहे. पवईकरांच्या या जखमा अजून ताज्या असतानाच आज सकाळी आयआयटी, पवई येथील ज्ञानमंदिर शाळेच्या मीटरबॉक्सला आग लागल्याची घटना घडली.

प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा सुरू असताना  मोठा आवाज झाला आणि संपूर्ण शाळेची वीज गेल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. शाळेच्या मीटर बॉक्सला आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. रस्त्यावर असणाऱ्या माती आणि लाद्यांच्या साहय्याने काही कर्मचारी आणि स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन विभागाच्या एक बंबाच्या साहय्याने काही काळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मिटरवर प्रचंड ताण निर्माण झाल्याने मीटर बॉक्सला आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या घटनेमुळे शाळेत चाललेला गलथान कारभार उघड झाला असून, शाळा प्रशासाना विरोधात पालकांमध्ये तीव्र संताप पहायला मिळाला.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!