हिरानंदानी, इवीटा इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग, बेडरूम जळून खाक

पवई हिरानंदानी गार्डन परिसरातील इविटा इमारतीच्या १५व्या मजल्यावरील १५०२ या फ्लॅटमध्ये सायंकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज घडली. घरमालक शेनॉय यांचा परिवार यावेळी घरातच होता, आगीची माहिती मिळताच त्यांनी घराबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिरानंदानी येथील इविटा इमारतीच्या १५व्या मजल्यावर सुदीप शेनॉय यांचा एक फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये त्यांचे आई-वडील राहत असतात. त्यांचा भाऊ संजय शेनॉय सुद्धा सुट्टीनिमित्त येथे आले आहेत.

संध्याकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बेडरूममधील एसीमधून धूर निघत असल्याचे परिवाराच्या लक्षात येताच त्यांनी घराबाहेर धाव घेत इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती दिली. असे याबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

‘माहिती मिळताच गस्तीवर असणाऱ्या आमच्या एसटीएफ टीमने घटनास्थळी धाव घेत तिथे उपलब्ध असणाऱ्या फायर फायटिंग साधनांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवत आगीला पसरण्यापासून रोखले’ असे याबाबत बोलताना हिरानंदानी समूहाचे सुरक्षा प्रमुख कमांडर संजय सिंग यांनी सांगितले.

घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ‘शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

‘सुरक्षारक्षक आणि हिरानंदानी एसटीएफच्या मदतीने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न गेली अनेक वर्ष सतावत आहे. आज जवळपास अर्ध्या तासानंतर अग्निशमन घटनास्थळी पोहचले आहे. चांदिवली येथे मिनी अग्निशमन केंद्र बनवल्याचे सांगितले जात आहे, मात्र तिथे केवळ एक एम्बुलेंस उभी असते. जागा अडवणे आणि नेत्यांना आपले फोटो झळकावण्या व्यतिरिक्त त्याचा कोणताच उपयोग नाही. प्रतिनिधी आणि प्रशासनाने याचा गंभीर विचार करून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!