चांदिवलीत इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग

डावीकडे -फ्लॅटमध्ये लागलेली आग; उजवीकडे -जळालेल्या रूमचा भाग

चांदिवली येथील नहार अमृत शक्ती परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना सोमवार, १ मार्चला घडली. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नहार अमृत शक्ती येथील वोईला अल्बा नामक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटला ही आग लागली होती. या संदर्भात माहिती मिळताच मरोळ आणि विक्रोळी अग्निशमन विभागाच्या गाड्या, बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

“घरातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. इमारतीतील लोकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनेत रूमचा भाग जळून खाक झाला आहे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.


आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!