आयआयटीत खाजगी कँटिंगमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही

रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण

वईतील आयआयटी कॅम्पसमध्ये एका खाजगी कँटिंगमध्ये आग लागल्याची घटना आज संध्याकाळी ९.१० च्या सुमारास घडली. विद्यार्थी, आयआयटी सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, कँटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही.

आज (सोमवारी) संध्याकाळी ९.१० वाजताच्या सुमारास आयआयटी कॅपसमध्ये येथील हॉस्टेल क्रमांक ४ जवळ असणाऱ्या खाजगी कँटिंगमधून धूर निघत असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी अंतर्गत सुरक्षा यंत्रणांना याबाबत माहिती देवून, हॉस्टेलमधील अग्निशामक यंत्रांच्या सहाय्याने आगीला रोखण्याचे काम केले.

‘मी माझ्या परिवारासोबत फिरत असताना हॉस्टेल ४ जवळच्या कँटिंगमधून आगीचे लोट बाहेर येताना दिसले. याबाबत आयआयटी यंत्रणेला फोन करून कळवण्याचा प्रयत्न केला, मात्र समोरून फोन उचलला गेला नाही. तोपर्यंत आग चांगलीच पसरली होती आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षारक्षक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. सुरक्षारक्षक आणि विद्यार्थ्यांनी अग्निशमन येईपर्यंत होस्टेलमध्ये असणाऱ्या साधनांच्या सहाय्याने आगीला थोपवून धरले’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना विद्यानंद काकडे यांनी सांगितले.

आगीवर नियंत्रण मिळवले गेले आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे समोर आलेले नाही. आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, शोर्टसर्किट किंवा गॅस लिकेजमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!