इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना सोमवार, ५ ऑक्टोबर रात्री पवई परिसरात घडली. प्रसंगावधान राखत चालकाने गाडी बाजूला लावत गाडीतून बाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारच्या जीवित हानीची नोंद झाली नसून, टेम्पो जळून खाक झाला आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो क्रमांक एमच १५ एफवी ११५४ असल्फा येथून इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून नाशिकला निघाला होता. पवई जेविएलआरमार्गे हा टेम्पो रामबाग उड्डाण पुलावर आला असता गाडीच्या इंजिन भागातून धूर निघत असल्याचे चालक घनश्याम वर्मा याच्या लक्षात आले. “गाडी बाजूला लावून पाहणी करायला तो उतरला असताच टेम्पोने पेट घेतला असे त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

“काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेत, आगीने रौद्र रूप धारण केले होते. यामुळे उड्डाण पुलावरील वाहतूक काही काळासाठी सर्विस रोडवरून वळवण्यात आली होती.” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

अग्निशमन विभागाचे २ इंजिन घटनास्थळी दाखल होत त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत टेम्पो आणि टेम्पोतील सामान जळून खाक झाले होते.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. शोर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!