गलेरिया सर्कलला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव

पवई, हिरानंदानी गार्डन्स येथील गलेरिया सर्कल म्हणजेच काला खंबा चौकाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, सुदीप्तो लाहीरी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, बिजेपी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शनिवारी ९७ वी जयंती साजरी करण्यात आली. २०१४ पासून, वाजपेयींची जयंती दरवर्षी ‘सुशासन दिन’ म्हणून सुद्धा साजरा केला जाते. तीन वेळा देशाचे पंतप्रधान होण्याबरोबरच ते हिंदी कवी आणि प्रखर वक्तेही होते.

शनिवारी देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस साजरा केला गेला. “भारताच्या राजकीय इतिहासात वाजपेयी हे एक कुशल राजकारणी, प्रशासक, भाषाशास्त्रज्ञ, उदारमतवादी, समता आणि समतेचे समर्थक मानले जात होते. त्यांच्या या संपूर्ण गुणांसह ते येणाऱ्या पिढीला आणि सर्वांना कायम लक्षात राहावे म्हणून आपल्या परिसरात काहीतरी करण्याची आमची इच्छा होती. म्हणूनच हिरानंदानी येथील गलेरिया सर्कलला त्यांचे नाव देण्याचे आम्ही ठरवले होते,” असे याबाबत बोलताना स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “२०२०मध्येच या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती, मात्र कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला पाहता हे कार्य पुढे ढकलण्यात आले होते. यावर्षी २५ डिसेंबरला वाजपेयी यांच्या ९७व्या जयंतीचा मुहूर्त साधत खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते या चौकाचे नामकरण ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी चौक’ असे केले आहे.

English Summary

Galleria Circle i.e. Kala Khamba Chowk at Hiranandani Gardens, Powai has been named as Bharat Ratna Atal Bihari Vajpayee chouk. The naming ceremony was held on Saturday 25th December in the hands of Member of Parliament (MP) Manoj Kotak. Niranjan Hiranandani – Managing Director of Hiranandani Group, Sudipto Lahiri, local corporator Vaishali Patil, nominated corporator Srinivas Tripathi, BJP activists and citizens were present on the occasion.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!