पवईत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

 

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

का १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ५ वाजता पवईतील महात्मा फुलेनगरात घडली. पूजा सिद्धार्थ भदरगे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव असून, ती कॉम्पुटर शिक्षण घेत होती. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

पूजा ही आपल्या आईवडील व भावंडांसोबत पवईतील फुलेनगरमध्ये राहते. सोमवारी दुपारी कॉम्पुटर क्लासेसवरून आल्यावर ती अभ्यास करायला जाते म्हणून आपल्या शेजारच्या खोलीत गेली. बराच वेळ झाल्यावर सुद्धा पूजा परतली नाही  तसेच खोलीत काहीच हालचाल दिसत नसल्याचे पाहून पूजाचा मोठा भाऊ तिला पाहण्यासाठी गेला असता त्याला ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

कन्नमवारनगर येथील महात्मा फुले रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  शवविच्छेदनात गळफासामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पूजाने कोणतीही चिट्ठी किंवा तिला काही त्रास असल्याबाबत कोणासही वाच्यता केली नसल्याने आत्महत्ये मागचे  नक्की कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र घरची हलाखीची परिस्थिती तिच्या आत्महत्ये मागचे कारण असू शकते असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

पूजा अनेक सामाजिक संघटनांशी जोडली गेली होती. तिच्या आत्महत्येमागे घरची हलाखीची परिस्थिती हे कारण असणे शक्यच नाही असे समाजसेवी संघटनांकडून बोलले जात आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes