अजून किती निर्भया? हाथरस घटनेच्या निषेधार्थ पवईत तीव्र आंदोलन

अजून किती निर्भया? हाथरस घटनेच्या निषेधार्थ पवईत तीव्र आंदोलन

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटत आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवईमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महिला, सामाजिक – राजकीय संघटना आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित येत निषेध व्यक्त करत उत्तरप्रदेश सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. अजून किती निर्भया? असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.

अजून किती निर्भया? हाथरस घटनेच्या निषेधार्थ पवईत तीव्र आंदोलन

एकीकडे देशभरात कोरोना महामारीने थैमान घातलेला असल्याने संपूर्ण देश त्रस्त असतानाच उत्तरप्रदेश, हाथरस येथे एका १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. पिडीत तरुणीवर काही तरुणांनी सामूहिक बलात्कार करून तिचे निष्ठूरपणे हाल केले होते. या तरुणीचा मृत्यू झाला असून, आता या घटनेचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत.

या घडलेल्या घटनेच्या तीव्र निषेध व्यक्त करत शुक्रवार ०२ ऑक्टोबर रोजी आयआयटी मेनगेट समोरील चौकात पवईकर आणि विद्यार्थ्यांनी उत्तरप्रदेश सरकार व प्रशासन याबद्दल तीव्र निषेध करत घोषणाबाजी केली.

जस्टीस फॉर विक्तीम, पिडीतेला न्याय मिळालाच पाहिजे, योगी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. अजून किती निर्भया? या देशात बघाव्या लागणार असा संतप्त सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.

देशात वाढत चाललेल्या अन्याय अत्याचार घटनेला आळा बसण्यासाठी सर्वत्र सर्वानुपरी प्रयत्न चालू आहेत. तरीही निर्भया, खोपर्डी आणि आता हाथरस अशा घटना वारंवार घडत असल्याने समाजातील जनता तीव्र आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलने मोर्चे काढून आपला निषेध व्यक्त करताना दिसत आहेत.

इनपुट- प्रतिक कांबळे; फोटो – रमेश कांबळे

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!