नवतरूणांतर्फे पवईत घरोघरी धान्यवाटप

@रविराज शिंदे

पाठीमागील वर्षभरापासून कोरोनाचा कहर आणि टाळेबंदीमध्ये अडकल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या काळात काहींनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असून, अनेकांच्या कामावर परिणाम झाला आहे. यामुळे सामान्य कुटुंबात पोटाचा प्रश्न निर्माण होत असतानाच पवईतील काही तरूणांनी एकत्र येत नागरिकांना घरोघरी जावून धान्य वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

आयुष फांऊंडेशनच्या माध्यमातून या तरूणांनी पवईतील गरीबनगर, मोरारजीनगर इंदिरानगर आदी परिसरात घरोघरी जावून धान्य वाटप केले. “लॉकडाऊनमुळे अनेकांचे दैनंदिन जीवन कोलमडले असताना एक मदतीचा हात म्हणून आम्ही सर्व तरूण मिळवून हे कार्य करत आहोत. आमच्या या कार्याला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून, असे अनेक उपक्रम आम्ही येत्या काळात राबवणार आहोत,” असे याबाबत बोलताना आयुष फाऊंडेशनचे समद सोलकर यांनी सांगितले.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितेश वानखेडे, खजिनदार निखिल खंडागळे, सूरज काटे, विशाल खंडागळे, मनोज तेली, प्रथमेश भवार सहीत अनेक तरूणांचे या कार्यात मोलाचे सहकार्य लाभले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!