पवई हिरानंदानीमध्ये सोनू निगम आणि गोविंदा यांनी केले आनंद मिलिंद म्युजिक अकॅडमीचे उदघाटन

पवई, हिरानंदानी येथे असणाऱ्या हिरानंदानी लर्निंग इन्स्टिट्यूटमध्ये काल शनिवारी बॉलीवूडलमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी आनंद-मिलिंद यांच्या ‘”आनंद मिलिंद अकॅडमी ऑफ म्युजिक”चे उदघाटन गायक सोनू निगम आणि अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बांधकाम व्यवसायात उच्च शिखरावर विराजमान असणाऱ्या हिरानंदानी गृपतर्फे शिक्षण संस्था सुध्दा चालवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पवईमध्ये हिरानंदानी लर्निग इन्स्टिट्यूटची निर्मिती करण्यात आली आहे. विविध कला क्षेत्रात रुची असणाऱ्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून इथे त्या- त्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींची अनेक कोर्सेस येथे शिकवली जात आहेत.

हिंदी चित्रपट सृष्टीला आपल्या संगीताने अजरामर करणाऱ्या आनंद-मिलिंद या जोडीच्या सोबत आता येथे आनंद मिलिंद अकॅडमी ऑफ म्युजिक सुरु करण्यात आली असून, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गायनासोबतच कि-बोर्ड, गिटार आणि विविध वाद्यांच प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शनिवारी गायक सोनू निगम आणि अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते अकॅडमीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी हिरानंदानी गृपचे कार्यकारी संचालक निरंजन हिरानंदानी सह संगीत क्षेत्रातील गायक सुरेश वाडकर, अभिजित, अलका याग्निक, संगीतकार जतीन पंडित, समीर, अभिनेते मुकेश रिशी, सतीश कौशिक आदि उपस्थित होते.

सुरेश वाडकर

अभिजित

सोनू निगम

अलका याग्निक

सतीश कौशिक

जतिन पंडित

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

2 Responses to पवई हिरानंदानीमध्ये सोनू निगम आणि गोविंदा यांनी केले आनंद मिलिंद म्युजिक अकॅडमीचे उदघाटन

 1. Dipti ambekar August 21, 2017 at 6:31 pm #

  It’s my pleasure that I am a part of this academy.

  • आवर्तन पवई August 24, 2017 at 6:58 am #

   अभिनंदन.. खूप खूप शुभेच्छा !

   – वृत्त संपादक –

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes