व्यावसायिकाला ऑनलाईन ५.८ लाखाचा गंडा

वईमधील हिरानंदानी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाला फिशिंगद्वारे (ऑनलाईन फसवणूक) ५.८ लाखाचा गंडा घातला आहे. जवळचा मित्र असल्याचे भासवून मेलद्वारे पैशाची मागणी करून अनोळखी व्यक्तीने फसवणूक केली असून, याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरु केला आहे.

गुन्ह्यात वापरला गेलेला इमेल हा मित्राच्या इमेल अकौंटशी मिळता-जुळता असल्याने किंवा हॅक केला असल्यामुळे सहज फसवणूक घडलेली आहे.

पवईमधील हिरानंदानी येथे राहणारे व्यावसायिक तरुण ग्रोव्हर (५३) यांना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता एक इमेल प्राप्त झाला. या इमेलमध्ये मेल करणार हा ग्रोव्हर याचा मित्र असून, तो अडकून पडला आहे आणि त्याला पैशांची नितांत गरज असल्याचे सांगितले होते.

“ग्रोवर यांनी जास्त विचार न-करता इमेलमध्ये दिलेल्या बँक अकौंट नंबरवर लगेचच मागणी केलेली ५.८ लाखाची रक्कम ट्रान्स्फर केली. पुष्टी येताच आपल्या मित्राला पैसे मिळाले आहेत का? याची खात्री करण्यासाठी फोन केला असता त्याने असा कोणताच मेल त्याने केला नसून, पैशाची मागणी केली नसल्याचे सांगितल्यावर ग्रोवर यांची फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.” असे एका वरिष्ठ आधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

ग्रोव्हर यांनी त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात भादवि कलम ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ सि, ६६ डी नुसार गुन्हा नोंद केला आहे.

“मेल करणाऱ्या व्यक्तीने पैशाची गरज कशासाठी आहे याचे कारण मेलमध्ये दिलेले नाही; त्याने फक्त त्याला पैशांची गरज आहे एवढेच म्हटले आहे. फसवणुकीसाठी वापरला गेलेला इमेल मित्राचा आयडी हॅक करून वापरला गेला आहे कि तसाच वाटणारा दुसरा तयार केला आहे याबाबत आम्ही सायबर सेलची मदत घेतली आहे.” असे याबाबत बोलताना आधिकाऱ्याने सांगितले. 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!