प्रामाणिक पवईकराने परत केली रस्त्यात सापडलेली महिलेची बॅग

महिलेची बॅगलॉकडाऊनमुळे अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक आवक कमी झाली आहे. अशात हाती आलेली संधी गमावण्याचा कोण विचार करेल? मात्र प्रामाणिक माणूस नेहमीच प्रामाणिक असतो याचेच उदाहरण सोमवारी पवईकराच्या रुपात पाहायला मिळाले. सचिन कुचेकर यांना प्रवासा दरम्यान रस्त्यात मिळालेली महिलेची बॅग त्यांनी मालक महिलेला परत करत आपली माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे एक उदाहरण समोर ठेवले आहे.

पवईतील तुंगागाव येथे राहणारे कुचेकर एअरपोर्टवर हाउस कीपिंगचे काम करतात. रविवारी ते आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कांदिवली येथे गेले होते. सोमवारी परत आपल्या पवई येथील घरी परतत असताना मालाड येथील दिंडोशी उड्डापुलावर एक लेडिज बॅग रस्त्याच्या मधोमध पडलेली त्यांना दिसली. “एअरपोर्टवर आम्हला बॅग हाताळण्याची सवय आणि प्रशिक्षण असते. मी बॅग उचलून पहिली असता त्यात काही कागदपत्रे, सॅनीटायझर आणि मोबाईल असे समान होते.” असे कुचेकर यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले “मी बराच वेळ तिथे कोणी येतेय का याची वाट बघत उभा होतो, मात्र २०-२५ मिनिट कोणीच आले नाही. शेवटी पोलीस ठाण्यात बॅग जमा करण्यासाठी निघालेलो असतानाच त्या बॅगेतील मोबाईलवर एक फोन आला. मी त्यांना आपली ओळख सांगत मला एक महिलेची बॅग रस्त्यावर पडलेली मिळाली आहे, त्यात हा फोन होता. मी पवईला राहतो माझ्याकडे ही बॅग सुरक्षित आहे, असे फोनवर बोलणाऱ्या महिलेला विश्वास दिला.

काही मिनिटांत फोन करून महिलेने पूनमनगर येथील सिग्नलवर ते येत असल्याचे कुचेकर यांना सांगितले. तिथे भेटून ओळख पटवून त्या महिलेला ती बॅग परत करण्यात आली.

ती महिला विलेपार्ले येथे राहते. मोटारसायकलवरून प्रवास करताना ती बॅग रस्त्यावर पडली होती. त्यांच्या लक्षात आले तेव्हा शोधाशोध सुरु असताना त्यांच्या आईने केलेल्या फोनवरून ती बॅग सुरक्षित असल्याचे ऐकून त्यांना दिलासा मिळाला होता. “मी बॅग परत केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप मोठे समाधान मिळाले.” असे याबाबत बोलताना कुचेकर याने सांगितले.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!