तापमान कमाल, बच्चेकंपनीची धमाल ..!

मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून, मुंबईकर आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळत आहेत. जावेच लागले तर पुरेशी काळजी घेताना दिसतात. उन्हाच्या कडाक्यात स्वतःला वाचवण्यासाठी जिकडे तरुण मंडळी विविध कॉस्मेटीक प्रोडक्ट्सचा वापर करताना आढळून येत असतानाच, पवईतील बच्चेकंपनीने मात्र या उन्हाच्या तडाख्याला न-जुमानता धमाल-मस्ती करण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली आहे.

पवई, हिरानंदानी येथील चंद्रभान शर्मा चौकात असलेल्या कारंज्यामधून (फाउंटेन) उडणाऱ्या पाण्यात मनसोक्त भिजत बच्चेकंपनी कशाचीही पर्वा न-करता मनमुराद आनंद लुटताना आढळून येत आहे. मुलांची ही अनोखी शक्कल येथून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, अनेकांच्या आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या होत आहेत.

-छायाचित्रे: रमेश कांबळे

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes