पवईत ३ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न, एका ठिकाणी डल्ला मारण्यात यशस्वी

पाठीमागील काही दिवसांपासून पवई परिसरात चोरीचा सूर लावलेल्या चोरट्यांनी मंगळवारी पुन्हा पवईत ३ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. २ दुकाने आणि एक घर असे चोरट्यांनी भेदत घरातून १ लाखापेक्षा अधिक किंमतीचे दागिने आणि किंमती सामान चोरट्यांनी चोरी केले आहे. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

आर्थिक राजधानी असणारी मुंबई आता हळू हळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून, यासोबतच गुन्हेगारीचा आलेख सुद्धा पुन्हा वाढू लागला आहे. पवई परिसरात तर पाठीमागील काही दिवसात घरफोडी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे.

झोपडपट्टी परिसरात होणाऱ्या घरफोड्या पोलिसांसाठी एक मोठे आव्हान निर्माण करणारे झाले आहे. त्या भागात सीसीटीव्ही नसल्याने आणि अंधाराचा फायदा घेवून चोरटे आपला डाव साधत असल्याने चोरट्यांबद्दल कोणतीची माहिती उपलब्ध होत नाही.

मंगळवारी रात्री सुद्धा दोन अज्ञात चोरट्यांनी आयआयटी मेनगेट समोरील भागात असणारे एशियाड मेडिकल, सेल पोइंट मोबाईल शॉप आणि याच्याच पाठीमागे गल्लीत असणाऱ्या एका घरात चोरीचा प्रयत्न केला. “यातील मेडिकल आणि मोबाईल शॉपचे चोरट्यांनी शटर उचकटले आहे, मात्र काहीच मौल्यवान चोरीला गेलेले नाही,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “घरातून मात्र चोरट्यांनी सोन्याचे दागिन्यासह मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे.

“आम्हाला चोरीच्या ठिकाणांवरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून, दोन तरुण संशयास्पद वावरताना दिसून आले आहेत. त्या दोघांचीही ओळख पटवून शोध सुरु करण्यात आला आहे,” असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“पवई परिसरात यापूर्वी चोरी करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. आम्ही आमच्या गुप्त बातमीदारांना याबाबत माहिती दिली असून, चोरटे लवकरच आमच्या ताब्यात असतील.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!