कडक पोलीस बंदोबस्तात आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर भुईसपाट

१९२५ पासून थाटात उभे असणारे आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर आज सकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास हटवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत पालिकेने सकाळी हि निष्कासनाची कारवाई केली. भक्तांच्या भावनांचा उद्रेक होवून वातावरण बिघडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

९२ वर्षापूर्वी पवई तलावाचे काम सुरु असताना मारुतीची मूर्ती श्रीधर परांजपे यांनी आता निष्कासित करण्यात आलेल्या मंदिराच्या येथे असणाऱ्या एका झाडाखाली स्थापित केली होती. आदिशंकराचार्य मार्गाला अडचण नसणारे मारुती मंदिर मात्र २००५ साली सुरु झालेल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडच्या कामात आणि कालांतराने वाहतुकीला अडथळा बनू लागल्याने त्याला हटवण्यासाठी शासन आणि प्रशासन दरबारी हालचाली सुरु झाल्या. मात्र, जागृत देवस्थान असलेल्या मंदिराला हटवण्यास भक्तांकडून जोरदार विरोध दर्शवण्यात आला. प्रशासनाने अनेक प्रयत्न केले मात्र प्रत्येकवेळी जनतेच्या विरोधापुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता.

निष्कासन वेळी हनुमान चालीसा, ब धार्मिक पुस्तके बाजूला हटवताना पोलीस अधिकारी

राम मंदिरमध्ये ठेवण्यात आलेली मारुतीची मूर्ती. बसलेले मारुती मंदिर मालक श्रीधर परांजपे

काही वर्षे शांत पडलेले प्रकरण तेव्हा पुन्हा पेटले जेव्हा पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हीलच्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा व महाराष्ट्र शासनाचा ०४.१०.२०१० रोजी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या पारित करण्यात आलेल्या आदेशाचा दाखला देत, पालिका एस विभागाने ०६ एप्रिल २०१७ व ८ मे २०१७ रोजी पुन्हा आधीच्या नोटीसीचा संदर्भ देत मंदिर मालक ह. श्री. परांजपे यांच्या नावे नोटीस देवून मंदिर काढण्यात यावे अन्यथा निष्कासनाची कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

ज्यानंतर कारवाईची टांगती तलवार पाहता न्यायालयात धाव घेतली होती. ५ डिसेंबरला न्यायालयात झालेल्या निर्णयात “याचिकाकर्त्यांनी मारुती मंदिरात असणारी मूर्ती नवीन ठिकाणी (राम मंदिर) येथे हलवण्यास संमती दिली आहे. जुन्या मंदिरात असणारी मूर्ती १५ डिसेंबर २०१७ पूर्वी म्हणजेच केवळ दहा दिवसाच्या आत नवीन मंदिरात हलवण्यात यावी. जुन्या मंदिराच्या ठिकाणी असणारे बांधकाम त्वरित हटवण्यात यावे. बांधकाम दिलेल्या वेळेत हटवले गेले नाही तर संबंधित प्रशासन किंवा पालिकेने ते हटवावे.” असे आदेश दिले होते ज्याची अंमलबजावणी करत मंदिर मालक आणि प्रशासन यांनी कडक पोलीस बंदोबस्तात आज सकाळी ४.१५ वाजता प्रथम मूर्ती शेजारीच असणाऱ्या राम मंदिरात हलवत जागा मोकळी केली.

मंदिर जागेवर डांबरीकरण करताना पालिका अधिकारी

निष्कासन कारवाई

मंदिर हटवताच पालिकेने जमीन सपाट करत डांबर टाकून मंदिर जागेवर रस्त्याचे काम सुद्धा सुरु केले होते. संपूर्ण कारवाई आणि रस्ता बनवण्याच्या कामामुळे वाहतूक वळवल्याने ऐन कामावर जायच्या वेळीच जेव्हीएलआरवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

fblike url=”www.facebook.com/avartanpowai.info” style=”standard” showfaces=”false” width=”600″ verb=”like” font=”arial”]

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!