आयआयटीमध्ये प्रयोग करताना हायड्रोजन बलूनचा स्फोट, तिन जखमी

मुंबई, पवई येथील आयआयटीमधील एरोस्पेस डिपार्टमेंटमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रयोग करताना झालेल्या स्फोटात ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्रशांत सिंग, तुषार जाधव आणि रजत जैस्वाल अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

आयआयटी मुंबईमध्ये पार्ट-टाइम काम करणारे तुषार जाधव आणि इतर दोन प्रशिक्षणार्थी प्रयोग करत असताना ही घटना घडली. येथील एरोस्पेस विभागात हा प्रयोग केला जात होता.

शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास प्रयोगा दरम्यान फुग्यामध्ये हायड्रोजन भरत असताना फुगा फुटल्याने जोरदार स्फोट झाला. या घटनेत तिघे जखमी झाले असून, आयआयटी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes