पवईत हायजेनिक रक्तदान शिबीर

पवईत हायजेनिक रक्तदान शिबीराचे आयोजन

@रविराज शिंदे, रमेश कांबळे: देशात कहर माजवणाऱ्या कोरोना वायरसशी लढा लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. देशात लॉकडाऊन असून, या काळात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी छोट्या छोट्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पवई बीजेपी वॉर्ड १२२ तर्फे आयआयटी पवई येथील जैन मंदिर हॉलमध्ये रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.

स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या नेतृत्वात हिरानंदानी रुग्णालयाच्या सहाय्यातून जैन मंदीर हॉलमध्ये आयोजित या रक्तदान शिबीरात ७० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

पवईत हायजेनिक रक्तदान शिबीराचे आयोजन

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीर सुरु होण्यापूर्वी माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या नियोजनाखाली या भागात निर्जंतुकीकरण करण्यात आले तसेच या रक्तदान शिबिराच्या कालावधीत सोशल डिस्टंन्सीग पाळता यावे म्हणून योग्य नियोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच रक्तदान शिबीराला पवईकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

या शिबिराचे खास आकर्षण ठरले ते लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर आणि चौका चौकात उभे राहून कायदा सुव्यवस्था राखत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य निभावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई आणि अधिकाऱ्यांनी येथे रक्तदान करत एक आदर्श निर्माण केला.

पवईत हायजेनिक रक्तदान शिबीराचे आयोजन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि २१ दिवसांच्या देशव्यापी लॉक-डाऊनमुळे रक्तपेढ्यांना आवश्यक रक्तपुरवठ्याची कमतरता भासत आहे. यामुळे राष्ट्रभर गंभीर वैद्यकीय मालिकांना अडथळा निर्माण झाला आहे. ज्याला पाहता आरोग्यमंत्री टोपे यांनी नागरिकांना आणि सामाजिक संस्थाना नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात जसे रक्तदान शिबीर आयोजित करता तसे न करता छोट्या छोट्या प्रमाणात सोशल डिस्टंन्सीग राखत याचे आयोजन करावे अशी विनंती केली होती.

याबाबत ‘आवर्तन पवई’शी बोलताना वैशाली पाटील म्हणाल्या, “आम्ही राष्ट्रीय संकटकाळात आहोत, या मोहिमेमागील आमचा उद्देश स्पष्ट व सोपा होता. १४ एप्रिलपर्यंत देशाला प्रभावीपणे लॉकडाऊन केले आहे, अशा काळात वैद्यकीय सुविधेला आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देणे आमचे उद्दिष्ट आहे. कोरोना विषाणूचा प्रसाराच्या या गंभीर टप्प्यात आम्ही आवश्यक रक्त पुरवठा सुनिश्चित केला पाहिजे.”

“देश या काळात वैद्यकीय गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असताना, वैद्यकीय सेवांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या रक्तपेढय़ांमधील रक्ताची आवश्यक पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या परिसरातील रहिवाशांनी यात मोठा सहभाग दिला आहे. या परीक्षेच्या वेळी ते रक्त देण्यासाठी समोर आले याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.” असे याबाबत बोलताना श्रीनिवास त्रिपाठी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!